MALSHEJ GHAT ACCIDENT: कल्याण-नगर महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात, पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू

Malshej Ghat accident: माळशेज घाटात भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, चौघांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावर माळशेज घाटाच्या जवळ आवळ्याची वाडी येथे हा अपघात झाला आहे. दोन वाहनांची समोरा समोर जोरदार धडक झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कल्याण - अहमदनगर महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात झाला आहे. दुधाचा टँकर आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच जवळच असलेल्या गावातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. ग्रामस्थांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. तसेच याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी हालचाली सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्यांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. अपघातात मृत्यू झालेले नागरिक हे पांगरी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

अकोल्यात आमदार किरण सरनाईक यांच्या पुतण्याच्या गाडीला अपघात

शुक्रवारी (3 मे 2024) अकोल्यात एक भीषण अपघात झाला. आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या गाडीला हा अपघात झाला. अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या गाडीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये सरनाईक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सुद्धा समावेश असल्याचं वृत्त समोर आलं.

अकोल्यातील पातूर येथे हा अपघात झाला होता. अपघात झालेल्या दोन्ही कारचा अक्षरश: चुराडा झाला. घटनास्थळावरुन अपघात झालेल्या गाड्यांचे फोटो समोर आले आहेत. या फोटोवरुन अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.

या अपघाात रघुवीर अरुण सरनाईक (28 वर्षे), शिवानी अजिंक्य आमले (30 वर्षे), सिद्धार्थ यशवंत इंगळे (35 वर्षे), अमोल शंकर ठाकरे (35 वर्षे) आणि कपिल प्रकाश इंगळे यांचा मृत्यू झाला आहे. तर पियूष देशमुख, सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे (वय 37 वर्षे) हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच पोलीस पथकही घटनास्थळावर पोहोचले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करुन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

2024-05-04T05:54:50Z dg43tfdfdgfd