Trending:


Indiana State Library: पुस्तकांच्या देशा...

Indiana State Library: मी गिरगाव सोडून इंडियाना राज्यातील एका लायब्ररीत पाऊल टाकलं, अख्ख्या गिरगावाला पुरून उरतील इतकी पुस्तकं पाहिली, ‘एका वेळी २० पुस्तकं न्यायची परवानगी आहे’ हे वाक्य ऐकलं आणि वेडी झाले. जे वेड मजला लागले ते तुम्हालाही लागेलच.


Chhatrapati Sambhajinagar | संभाजीनगरला शासनाकडून ठेंगा!

गणेश खेडकर छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दवाढीसह नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव ९ वर्षांपूर्वी पाठविलेला आहे. तेव्हापासून हा प्रस्ताव धूळखात पडून असताना काही महिन्यांपूर्वी पाठविलेला प्रस्ताव मंजूर करीत पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी शासनाने नवीन ११ पोलिस ठाणे मंजूर केले. यातून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिसंवेद...


Raj Thackeray : शरद पवार नास्तिक आहेत, ते देवधर्म पाळत नाहीत; मी बोलल्यानंतर मंदिरात जातायत : राज ठाकरे

Raj Thackeray on Sharad Pawar, मुंबई : "शरद पवार नास्तिक आहेत, ते देवधर्म पळत नाही. त्यांच्या मुलीने देखील सांगितलं आहे. मी बोलल्यावर ते प्रत्येक मंदिरात जायला लागले. त्यांचं हात जोडणे देखील खोटे आहे", असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेचा मुंबईत राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. समुद्रात महाराजांचा पुतळा उभारण्यापेक्षा हेच हजारो कोटी...


Baba Siddique Shot Dead Superfast : बाबा सिद्दीकी सुपरफास्ट : 13 ऑक्टोबर 2024 : abp majha

Baba Siddique Shot Dead Superfast : बाबा सिद्दीकी सुपरफास्ट : 13 ऑक्टोबर 2024 : abp majha अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते बाब सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची सूत्रांची माहिती आहे.. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींपैकी करनैल सिंह हरियाणाचा तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती आहे. हे तिन्ही हल्लेखोर रिक्षानं घटनास्थळी आल्याची माहिती असून या प्रकरणात चौथा व्यक्ती या तिघांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास बिश्नोई गँगप्रमाणेच एसआरए वादाच्याही अँगलने होणार असल्याची माहिती आहे.. एबीपी माझाच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिलीय. बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणात तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची सूत्रांची माहिती आहे. आरोपीनी बाबा सिद्धीकी यांचा हत्येपुर्वी बाबा सिद्धीकीवर पाळत ठेऊन हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. रात्री उशिरपर्यंत आरोपींची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. आरोपींची आजच वैद्यकीय चाचणी करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुन्हे शाखेची पथकं फरार आरोपींचा शोध घेत आहेत.


China 1949 to 2024 : साम्यवादी चीनची पंच्याहत्तरी

China Marks 75 Yrs Of Communist Party Rule: चीनने अधिकृतरीत्या साम्यवाद स्वीकारला त्यास ७५ वर्षे झाली. माओ यांच्यापासून ते जिनपिंग यांच्यापर्यंतचा हा प्रवास आहे. आजचा चीन भांडवलवादाकडे झुकलेला आहे. त्या देशाला आर्थिक महासत्ता व्हायचे आहे... अमेरिकेची जागा घ्यायची आहे. ते साध्य करण्यासाठी अनेक गोष्टी चीनला कराव्या लागतील.


Navratri 2024 : रावण दहनाने झाली नवरात्रोत्सवाची सांगता

बन्सीलाल अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला. विजयादशमी म्हणजेच दसऱ्यादिवशी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. ट्रस्टतर्फे यावर्षी प्रथमच रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अबालवृद्ध पुणेकर नागरिक अपूर्व उत्साहात उपस्थ...


Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय, पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस

Maharashtra Weather Update: सध्या मान्सून माघार घेत असून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. पुढील चार दिवसही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


Black Panther : ब्लॅक पँथरमुळे समृद्ध जंगलाची प्रचिती

ठाणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील भैरवगड ते रांगणागड या जवळपास 15 ते 20 किमी सह्याद्री पट्टयात हे ब्लॅक पँथर सापडले आहेत. यामुळे या जंगलाच्या समृद्धतेचा आणखी एक पुरावा मिळाला आहे. पश्चिम घाटात पट्टेरी वाघांचे अस्तित्वही आढळले आहे. सिंधुदुर्गातील आंबोली हिरण्यकेशी येथे यापूर्वी पट्टेरी वाघ कॅमेर्‍यात कैद झाला आहे. कुडाळ तालुक्यातील भैरवग...


बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपीला 11 वर्षांपूर्वीच कुटुंबाने घरातून केलं होत बेदखल, आजीने सांगितली हकीकत

Baba Siddique Shot Dead: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे हरियाणातील कैथलशी जोडले जात आहेत. या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांच्या दाव्यानुसार ते लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहेत. या दोन संशयितांपैकी एक हरियाणाचा गुरमेल बलजीत सिंह आहे.आरोपी गुरमेल बलजीत सिंहच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांनी अनेक वर्षांपूर्वी गुरमेल बलजीत सिंहला घरातून हाकलून दिले होते....


Lawrence Bishnoi Post : कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर पुण्याचा

Lawrence Bishnoi Post : कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर पुण्याचा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांची घट्ट मैत्री होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत असल्याचं समोर आलं आहे. शनिवारी रात्री तीन जणांनी बाबा यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये ते जखमी झाले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. आतापर्यंत पोलिस तपासात काय समोर आलं? बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन जणांनी वांद्रे येथे गोळीबार केला. हे आरोपी 2 सप्टेंबरपासून मुंबईतील कुर्ल्यामध्ये भाड्याने खोली घेऊन रहात होते. त्यांनी राहत्या खोलीसाठी महिन्याला 14 हजार रुपये घरभाडं देत होते.चार जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती. यामध्ये चार आरोपी प्रत्येकी 50 हजार रुपये वाटून घेणार होते. या हत्येचा संबंध बिश्नोई गँगसोबत असल्याचं समोर आलं आहे. पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गँगचा एक सदस्य होता. तिन्ही आरोपी बिश्नोई गँगमधील सदस्याच्या संपर्कात आले. यानंतर त्यांनी बाबा सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी घेतली.


आता घरबसल्या मिळवा ई-शिधापत्रिका !

सेनगाव : केंद्र व राज्य शासनाच्या असलेल्या लोककल्याणकारी योजनेसाठी आवश्यक कागदपत्र म्हणून शिधापत्रिकेकडे बघितल्या जाते. त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून अतिशय कमी वेळात व विना शुल्क आता घरबसल्या ही शिधापत्रिका उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या लोककल्याणकारी व अनुदान तत्त्वावरील योजन "साठ...


Eknath Shinde Speech Dasara Melava : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी

मुंबई : सहा महिन्यात आमचं सरकार पडणार असं ठाकरे म्हणत होते, पण घासून-पुसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी असा टोलाही शिंदे यांनी लगावला. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला आली शिवसेना बाळासाहेब ठाकरेरुपी...


MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट ‘अ’ संवर्गांतील ‘सहयोगी प्राध्यापक’ पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ संवर्गातील सहयोगी प्राध्यापक पदासाठी भरती होणार आहे


Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकींची हत्या कशी झाली? 'असा' होता संपूर्ण घटनाक्रम

Baba Siddiqui Murder Incident Timeline : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची काल शनिवारी (12 ऑक्टोबरला) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दीकींच्या हत्येमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे


ABP Majha Headlines : 2 PM : 13 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 2 PM : 13 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षातील नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकूण तीन आरोपींनी भर रस्त्यावर त्यांना गोळ्या घातल्या आहेत. यातील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तिसरा आरोपी फरार आहे. दरम्यान, याच तिसऱ्या फरार आरोपीचे आता समोर आले आहे. हा आरोपी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता, असे समोर आले आहे. स्क्रॅप डिलरकडे करायचा काम सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत सहाभागी असलेल्या तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांनी तिसऱ्या व्यक्तीचे नाव शोधले आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या आरोपीची इतरही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या माहितीनुसार तिसरा आरोपी हा पुण्यात पाच ते सहा वर्षांपासून एका स्कॅप डिलरकडे काम करतोय. त्याने धर्मराज नावाच्या 19 वर्षीय आरोपीला काही महिन्यांपूर्वी पुण्यात बोलवून घेतलं होतं. एका आरोपीवर याआधीच हत्येचा गुन्हा त्यानंतर हत्येची सुपारी देणाऱ्या व्यक्तीने शिवा आणि धर्मराज यांची गुरुमेल याच्याशी भेट घडवून आणली होती. गुरुमेल हा 23 वर्षांचा आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. याआधी त्याच्याविरोधात एक हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धर्मराज आणि गुरमेल यांच्या नावावर याआधी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.


मरणानेही सुटका नाही!

पुण्यासारख्या तथाकथित प्रगत शहरात साधी मृत्यू दाखला त्वरित मिळण्याची व्यवस्था निर्माण करता येऊ नये, ही बाब कुणाच्याही लक्षातच कशी येत नाही? पालिकेकडे केलेल्या तक्रारींचे निवारण किती प्रमाणात होते, हा संशोधनाचा विषय.


Jayant Patil On Baba Siddique : महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था फेल्युअर आहे- जयंत पाटील

Jayant Patil On Baba Siddique : महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था फेल्युअर आहे- जयंत पाटील माजी राज्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशीच म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी भर रस्त्यावर ही हत्या झाली. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक आरोपी तर अवघ्या 19 वर्षांचा आहे. नुकतेच मिसुरडं फुटलेल्या या 19 वर्षांच्या आरोपीने बाा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. गोळ्या झाडणारे आरोपी नेमके कोण? बाबा सिद्दीकी यांच्यावर एकूण तीन जणांनी गोळीबार केला. यातील एक आरोपी सध्या फरार आहे. तर दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी नुकतेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींची नावे समोर आली आहेत. यातील पहिल्या आरोपीचे नाव हे गुरमेल बलजीत सिंह असे आहे. हा आरोपी 23 वर्षांचा आहे. तो मुळचा हरियाणा राज्याचा रहिवासी आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव धर्मराज कश्यप असे आहे. हा आरोपी अवघा 19 वर्षांचा आहे. ज्या वयात शिक्षण घ्यायचं त्या वयात धर्मराज नावाच्या या आरोपीने हातात पिस्तुल घेऊन गोळीबार केला आहे. पोलीस या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.


Indian Railway History: रुळांवरचा प्रवास

Indian Railway History: इतर कुठल्याही वाहतुकीच्या पर्यायापेक्षा रेल्वे हा कमी ऊर्जा वापरणारा वाहतूक पर्याय आहे, कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण देखील अतिशय कमी आहे. रेल्वेचं विद्युतीकरण, अनेक स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर आणि हायड्रोजन पॉवरवर चालणाऱ्या ट्रेन्समुळे पर्यावरणपूरक वाहतुकीचा चालना मिळाली आहे.


रवी बिश्नोईने रचला इतिहास

​रवी बिश्नोईने रचला इतिहास​


Haryana And J&K Election Result 2024: निवडणूक निकालांतील मिथके आणि वास्तव

Haryana And J&K Election Result 2024: हरियाणात भाजपला बहुमत मिळाल्याने मे-जून २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतरची भारतीय राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलली, अशा निष्कर्षाप्रत अनेक राजकीय पंडित पोहोचले आहेत. प्रत्यक्षात, भारतीय राजकारणात मागील काही काळापासून घडत असलेल्या प्रक्रियाच हरियाणा आणि जम्मू व काश्मीरमध्ये कायम राहिल्या आहेत.


Uddhav Thackeray Dasara Melava 2024 : शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची लगबग वाढलीय.. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालीय... विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.. Dasara Melava 2024: शिंदे, ठाकरे, मुंडे, जरांगे..., आज 4 दसरा मेळावे; 'आव्वाज' कोणाचा घुमणार?; राज्याचं लागलं लक्ष मुंबई: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून आज एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde), उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) या दोन पक्षांच्या दसरा मेळाव्यासह बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde)-धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचे स्वतंत्र मेळावे होणार आहे. त्यामुळे आज दसरा मेळाव्यांमध्ये (Dasara Melava 2024) आवाज कोणाचा घुमणार?, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाचे दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सायंकाळी 5 वाजता, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणार आहे. ठाकरे गटाकडून दीड ते दोन लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली असून शिंदे गटाकडून एक ते दीड लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आज गर्दीचा उच्चांक कोण मोडणार, याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहे.


Trichy Airport Video: 36000 फुट उंचीवर अडीच तास सुरू होता मृत्यूचा थरार, महाराष्ट्राच्या लेकीने वाचवला 140 प्रवाशांचा जीव, कोण होती 'ती'?

टेकऑफनंतर 36000 फुट उंचीवर अडीच तास मृत्यूचा थरार सुरु होता. विमानात असलेले 140 प्रवाशी जीव मुठीत घेऊन बसले होते. तेव्हा पुण्याच्या या लेकीने त्यांचे जीव वाचवले.


कॉर्पोरेट राजकारणाचे ताणेबाणे

सर्वसाधारणपणे आपल्या सार्वजनिक जीवनात सर्वात बदनाम झालेला शब्द कुठला असेल तर तो म्हणजे ‘राजकारण’.


Enron Power Project: वायूमधून विद्युतनिर्मिती

Enron Power Project: एन्रॉन प्रकल्प सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्राला विजेची गरजच नाही, राज्यात मुबलक प्रमाणात वीज आहे, असे भाष्य या प्रकल्पाचे विरोधक करत होते. या आरोपांना उत्तर देण्यासाठी तीन दिवसरात्र सलग बसून आम्ही संगणकावर विद्युत पुरवठ्याची गरज कशी आहे, ह्याचे प्रोजेक्शन तयार केले. ही आकडेवारी आतापर्यंत खरी ठरलेली आहे. आमचा हा अभ्यास पाहून विरोधकांचा आवाज बंद झाला.


Thane Politics : पंतप्रधान दौर्‍याचा फायदा कुणाला?

ठाणे : राजकीय केंद्र बनलेल्या ठाण्यात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारी जाहीर कार्यक्रम झाला आणि त्याचा प्रभाव ठाणे जिल्ह्यात राजकीय घडामोडींवर पडला आहे. भाजपांतर्गत नाराजीतून होणारे पक्षांतर रोखण्यास नेतृत्वाला यश आले नवी मुंबईतील दोन्ही जागांचा तिढा सुटला. दुसरीकडे ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा...


Maitreya Dadashree : दादाश्री मैत्रीबोध : 13 Oct 2024 : ABP Majha

Maitreya Dadashree : दादाश्री मैत्रीबोध : 13 Oct 2024 : ABP Majha हेही वाचा : अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर बुधवारी रात्री वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. बाबा सिद्दिकी हे त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून निघत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. प्राथमिक माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्यावर ज्या खेरवाडी जंक्शनच्या परिसरात हल्ला झाला तेथील पथदिवे बंद होते. तसेच या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी हल्ला केला. त्यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. तर एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायात लागली. दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. त्यामुळे हल्लेखोरांकडे अत्याधुनिक बनावटीचे पिस्तूल असावे, असा अंदाज आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर तिन्ही हल्लेखोर पळून जात असताना जमावाने त्यापैकी दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. सध्या पोलिसांचे फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांना घटनास्थळी एक पिस्तुल आणि गोळीच्या पुंगळ्या मिळाल्या आहेत. घटनास्थळी मिळालेली पिस्तूल 9.9 एमएम डिटेचेबल मॅगझिन 13 राऊंडची होती. ही पिस्तुल अत्याधुनिक बनावटीची असल्याचे सांगितले जाते.