Sanay Raut Speech Dasara Melava : 2 महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्यासपीठावर; राऊतांचा दावा
Sanjay Raut Dasara Melava : मुंबई : देशभरात विजयदशमी दसरा साजरा होत असताना राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी यंदाचा दसरा राजकीय नेत्यांच्या सभांनी गाजणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विचारांचं सोनं लुटण्याची प्रथा सुरू केली. त्यामुळे, मुंबईतील शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. मात्र, यंदा राज्यात 4 दसरा मेळाव्यांकडे महाराष्ट्रातील जनेतेचं लक्ष लागून होतं. बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. तर, सावरगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा संपन्न झाला. आता,मुंबईतील शिवाजी पार्क आणि आझाद मैदानावर दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा होत असून शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. येथील मेळाव्यात भाषण करताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) जोरदार हल्लाबोल केला. तसेच, पुढील 2 महिन्यात या व्यासपीठावर आपण विजयी सभा घेणार असून उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असेही राऊत यांनी म्हटले. शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडत आहे. या दोन्ही मेळाव्यातून दोन्ही नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवणार हे निश्चित. मात्र, तत्पूर्वी शिवसेना ठाकरे व शिंदे गटातील नेत्यांनीच एकमेकांवर हल्लाबोल केला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांसह भाजपला लक्ष्य केले. आता, संजय राऊत यांनीही भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणात, आम्ही कधी वडिलांसमोर भाषण केलं नाही, बाळासाहेबांपासून ते आजपर्यंत. पण, यंदा मी वडिलांसमोर भाषण करतोय, असे आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरेंच्या या विधानावरुन संजय राऊतांनी भाषणाची सुरुवात केलीय. आदित्य तुम्ही आता लहान बाळ राहिलेले नाहीत, तुम्ही महाराष्ट्राचे, देशाचे नेते झालेले आहात, असे म्हणत आदित्य ठाकरेंना संजय राऊतांनी वडिलकीच्या नात्याने सूचना केली.
2024-10-12T15:53:51Z
Raj Thackeray Full Speech : शिंदे, ठाकरे ते शरद पवार; एकाच भाषणात सगळ्यांना डिवचलं! ABP MAJHA
Raj Thackeray Full Speech : शिंदे, ठाकरे ते शरद पवार; एकाच भाषणात सगळ्यांना डिवचलं! ABP MAJHA राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची सर्वदुर चर्चा आहे, या योजनेवरून अनेकदा विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे, अशातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढच्या दोन महिन्यात बंद होतील, असं म्हणत महायुती सरकारचे वाभाडे काढले आहेत. मेळाव्यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, आज ते लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहेत, कोणी मागितले होते ते, मला आपल्या इतकच्या राजकारण्यांचा उद्देशच कळत नाही. हेतूच कळत नाही, तुमच्याकडे कोणी मागितले होते पैसे असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. काय म्हणालेत राज ठाकरे? पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, आज मी तुम्हाला लिहून देतो, लाडकी बहीण योजना आहे ना त्याचे, गेल्या काही महिन्यांचे पैसे येतील कारण निवडणुका तोंडावर आहेत. या देखील महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील नंतर येणार नाहीत. यावरती जाऊ नका तुम्ही. हे जे पैसे वाटणं सुरू आहे. त्यावरून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होईल, या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय त्यांच्याकडे फुकटं, महिलांच्या हाताला काम द्या, त्या कमवतील पैसे, त्या बळकट आहेत, त्यांच्या हाताला काम द्या, कोणी मागितले आहेत फुकटं पैसे, गरीबाला पैसे, मजुराला पैसे, शेतकऱ्यांना वीज फुकट द्या, शेतकरी कुठे मागतोय फुकटं वीज ते फक्त विजेत सातत्य मागत आहे, राज्यात कोणीच फुकट काही मागत नाही, यांना त्या सवयी लावायच्या आहेत. एकदा का फुकट घेण्याची सवय लागली की, मग सगळे राजकीय पक्ष त्या पध्दतीने वागायला लागतात. त्यानंतर सर्वजण त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवत जातात. नागडा होणार आहे महाराष्ट्र. आपण राज् म्हणून काही विचार करणार आहोत की नाही, या सर्वातून हाताला काही लागणार नाही, असंही राज ठाकरेंनी यांनी यावेळी म्हटलं आहे.
2024-10-13T08:39:06Z
Mahadev Jankar Dasara Melava Beed : पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यात जानकर यांचं भाषण
Mahadev Jankar Dasara Melava Beed : पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यात जानकर यांचं भाषण हे देखील वाचा Mahadev Jankar Dasara Melava Beed : पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यात जानकर यांचं भाषण बीड: लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरासारखे दिसतात. त्यांनी स्वत:हून इकडे येण्याचा निर्णय घेतला. माझ्या दसऱ्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही. पण लक्ष्मण हाके (Laxman Hake) याठिकाणी आल्यानंतर त्यांनी भगवान बाबा आणि मुंडे साहेबांच्या स्मृतीला वंदन केले. मी याठिकाणी हाकेंचे स्वागत करते, असे वक्तव्य पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर (Dussehra Melava 2024) बीडमधील भगवान गडावरील मेळाव्यात भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी विराट जनसमुदायाला संबोधित केले. दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरुन पंकजा मुंडे यांनी त्यांच्या खास शैलीत भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांची ओळख करुन दिली. ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाकेदेखील या मेळाव्याला उपस्थित होते. त्यांची ओळख करुन देताना पंकजा मुंडे यांनी हाके यांचा गोंडस लेकरु असा उल्लेख केला. तेव्हा उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला. यानंतर पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महादेव जानकर (Mahadev Jankar), मोनिका राजळे (Monika Rajle), मेघना बोर्डीकर, नमिता मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, सुरेश धस (Suresh Dhas) , नाना करपे , वाघमारे नवनाथ, सदाशिव खाडे, माजी आमदार खंदारे, डॉ. सुनील कायंदे, योगेश जाधव, राधाताई सानप, बाळासाहेब आसबे, अरुण मुंडे, अनिल तांदळे, रामदास बढे, वाल्मीक कराड अशा मान्यवरांची लांबलाचक यादी वाचत त्यांचे स्वागत केले.
2024-10-12T10:53:46Z