नगर: पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पक्षाकडून शेवगाव-पाथर्डी मतदार संघामध्ये इच्छुक उमेदवारांना पसंती क्रमाने मतदान ठेवण्यात आले होते. त्यासाठी पाथर्डी-शेवगाव मतदार संघातील पदाधिकार्यांना बोलविण्यात आले होते.
यावेळी विद्यमान आमदार पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप एक गटाने केला. त्यामुळे निवडणूक निरीक्षकांसमोर काहीकाळ गोंधळ उडाल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करीत आहे.
पक्षाकडून इच्छुकांची चाचपणी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडून मतदारसंघ निहाय इच्छुकांसाठी पदाधिकार्यांकडून पसंती क्रमाने मतदान प्रक्रिया घेण्याचे काम सुरू आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज शहरातील शासकीय विश्राम गृहावर शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील इच्छुक व पदाधिकार्यांना बोलविण्यात आले होते. यावेळी आम्हाला निरोप पोचला नाही. अनेक पदाधिकार्यांच्या जागेवर डमी लोकांची नावे दिसत आहेत, असा आरोप काही पदाधिकार्यांनी भाजपचे जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक विजय साने यांच्यासमोरच केला.
त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. त्यामुळे शेवगाव पाथर्डी मतदार संघातील अंतर्गत कलह बाहेर आल्याचे बोलले जाते. दरम्यान, सुमारे 120 ते 125 पदाधिकार्यांनी पसंती क्रमाने केलेल्याची मतदान करून बंद पाकिटे निरीक्षकांकडे दिल्याचे समजते.
2024-10-02T10:13:08Z dg43tfdfdgfd