बातम्या

Trending:


Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Pune Shocking News: पुण्यातील वाकड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या गुप्तांगावर कुलूप लावले.


CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

CRPF Constable recruitment 2023 Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल (टेक्निकल अँड ट्रेड्समन) २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.


Pune Mumbai Expressway: प्रवाशांनो लक्ष द्या, आज आणि उद्या पुणे-मुंबई एक्सप्रेसवे या कालावधीसाठी बंद राहणार

Pune Mumbai Expressway Close Update: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) काही काळासाठी बंद राहणार आहे. या एक्सप्रेसवेवरील पुणे वाहिनीवर गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी आणि दुरुस्तीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा मार्ग बंद असेल. याचा फटका वाहनचालकांना बसणार आहे.


बलात्काराच्या खोट्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता, पीडितेच्या आईने केलेली खोटी तक्रार

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यात हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


Aditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, वरूण सरदेसाई प्रचारात एकत्र

Aditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, वरूण सरदेसाई प्रचारात एकत्र पाहायला मिळाले आहे. हे ही पाहा Sangli News: सांगलीच्या 'हंग' कॅफेत गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार, कॅफेची तोडफोड सांगली : सांगलीत (Sangli News) कॅफेत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत अश्लील व्हिडिओ तयार केले. त्यांनतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यानंतर संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड करायला सुरुवात केली. या प्रकरणाची आता संपूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. कॅफेमध्ये गैरप्रकार घडत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून कॅफेची तोडफोड करण्यात येत आहे. सांगलीतील कॅफे हंग ऑन असे कॅफेत गुंगीचे औषध देऊन अत्याचाराची घटना घडली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली. आज या घटनेचे पडसाद उमटले आहेत. संतप्त शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी आज आक्रमक घेतला आहे. आज शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी तीन कॅफेची तोडफोड केली आहे.


निकालविलंबाचा भुर्दंड

मुंबई विद्यापीठाकरिता असे गोंधळ काही नवे नाहीत. कित्येकदा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्त्यांसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचे असतात, परंतु परीक्षांचे निकालच लागत नाहीत. खासकरून विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असे प्रकार अनेकदा घडतात.


Shantigiri Maharaj Statment : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा, शांतिगिरी महाराजांचा दावा

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनाचा आम्हाला पाठिंबा असल्याचं मोठं वक्तव्य शांतिगिरी महाराजांनी केलं आहे. शांतिगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. शांतीगिरी महाराजांकडून (Shantigiri Maharaj) नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. शांतीगिरी महाराज प्रचारासाठी दररोज नवनवीन फंडे शोधत आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून शांतिगिरी महाराजांनी आज भव्य प्रचार रॅली काढली आहे. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठा दावा केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले आहे. नाशिकच्या गंगा घाटावरून शांतीगिरी महाराजांच्या रॅलीला सुरुवात झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली आयोजित करण्यात आली आहे. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे.


Parbhani : गोविंदपूर येेथे महिलेचा विनयभंग

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालूक्यातील गोविंदपूर येथील एका विवाहितेच्या पतीच्या मोबाईलवर मित्रासोबत काढलेले फोटो व अश्लील भाषेत मेसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. अनिल विठ्ठलराव उखळतकर (रा.बरबडी) असे संशयिताचे नाव आहे. फिर्यादी विवाहित महिलेस तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझे मित्रासोबत काढलेले फोटो व्हायरल करतो. असे म्हणत तीन ते चार वर्षापासुन सतत …


TOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 May 2024 : ABP Majha

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगावात सभा, नतंर मुंबईत उज्ज्वल निकमांसाठी देखील प्रचार करणार ((मालेगावमध्ये गरजणार योगी आदित्यनाथ)) निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार, सोमवारी मुंबई, ठाणे, कल्याणसह १३ जागांवर मतदान ((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा)) नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला, शिवाजी पार्कमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. चार जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील, उद्धव ठाकरेंची टीका, मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा घणाघात. राज ठाकरेंच्या भर मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सात मागण्या, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्यावर का बोलता म्हणत इंडिया आघाडीला टोला. मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा... पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आरोप... मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) मतदान झाल्यावर काही दिवसांनी मतदानाची टक्केवारी कशी वाढते याचं उत्तर द्या, एडीआर संस्थेच्या याचिकेवरून सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश ((मतदान टक्केवारीवरून नि. आयोगाला निर्देश)) नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता ((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट)) मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम ((मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचेच)) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज आणि उद्या दीड तास बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी साडे दहा ते दुपारी १२ पर्यंत बंद ठेवणार ((एक्स्प्रेसवे दीड तास बंद राहणार)) हरियाणाच्या नूहमध्ये भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा मृत्यू तर २४ जण जखमी ((हरियाणात बसला आग, ८ भाविक मृत्युमुखी)) तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी परतला, आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा ((तारक मेहता फेम 'सोढी'ची घरवापसी))


Cyber Crime : व्यावसायिकाला तब्बल एक कोटीचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला एक कोटी 20 लाखांचा आर्थिक गंडा घातला आहे. व्यावसायिकाने आपले पैसे सायबर चोरट्यांच्या हवाली तर केलेच; शिवाय बहिणीचे देखील पैसे दिले. याप्रकरणी भवानी पेठेतील 55 वर्षीय व्यावसायिकाने शिवाजीनगरमधील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान …


Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला जुळून येताय शिवयोगासह हे 4 संयोग, जाणून घ्या महत्त्व

Buddha Purnima 2024: पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते. प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व वेगळे असून यात बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गौतम बुद्धांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार बुद्ध हे श्री हरी विष्णूंचे अवतार आहे. त्यामुळे या दिवशी श्री हरी विष्णू आणि सत्यनारायण पूजा देखील केली जाते. पंचांगानुसार, यंदा 23 मे रोजी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आहे.


Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 17 May 2024

छगन भुजबळ नाराज असल्याचं कानावर, जयंत पाटलांची प्रतिक्रिया तर भुजबळ फक्त जागावाटपार्यंतच नाराज होते, तटकरेंचं स्पष्टीकरण शरद पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला सुनील तटकरेंची भेट, अनिल देशमुखांचा दावा, संपर्कात आलं तरी कोणालाही परत घेणार नसल्याचं वक्तव्य ११ मे पासून माध्यमापासून दूर असणारे अजित पवार महायुतीच्या सभेत भाषण ठोकणार अजितदादा पुन्हा सक्रिय झाल्याची तटकरेंची माहिती मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सांगता सभेत मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार , सभेपूर्वी मोदी चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि बाळासाहेब स्मृतीस्थळाला भेट देणार गेल्या १० वर्षांपासून बहुमत असतानाही संविधान बदलण्याचा प्रयत्न नाही,.... केवळ राजकीय स्थैर्यासाठीच ४०० जागा हव्यात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं स्पष्टीकरण महामुंबईसाठी बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची महासभा.. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार मुंबई पोलिसांना चकवा देण्यासाठी चार शहरं फिरणारा भावेश भिंडे अखेर उदयपूरमधून गजाआड, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई, तपास गुन्हे शाखेकडे दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल मे महिन्यातच, बारावीचा येत्या आठवड्यात तर दहावीचा शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होणार मुंबईत उष्णतेसोबत आर्द्रता वाढणार, दमट वातावरणामुळे उकाड्यात आणखी भर पडणार, २४ तास उष्ण आणि दमट वातावरण


Pune BGF jewellers theft : पुण्यात वानवडीतील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० किलोचे दागिने लंपास

Pune bgf jewellers daroda : पुण्यात भर दिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकत तब्बल ३०० ते ३५० ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


बारामतीपाठोपाठ शिरूरच्या EVM गोडाऊनमधली CCTV डिस्प्ले 24 तास बंद!

शिरूर, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : बारामती लोकसभेच्या ईव्हीएमवर सुरक्षिततेसाठीच्या सीसीटीव्हीचा डिस्प्ले 45 मिनिटे बंद पडल्याने मोठा वाद उभा राहिला. पण दुसरीकडे शिरूर लोकसभेच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या सीसीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद होता. याची उमेदवारांच्या प्रतिनिधींना थोडीसुद्धा कल्पना नव्हती. कारण जागेवर कुणीच नव्हते. सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली असून, अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात...


BJP-Shivsena Rada Mulund : भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर राडा! ABP Majha

मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झाला. कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसेवाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याचवेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले. त्यावरून दोन्ही कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कोटेचा यांच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही घटनेचा आढावा घेतला. हे ही वाचा मराठीला अभिजात दर्जा, सैन्य घुसवून ओवैसीसारख्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, राज ठाकरेंच्या 7 बेधडक मागण्या! Mahayuti Rally Shivaji Park Mumbai Raj Thackeray : शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. राज ठाकरे यांनी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज ठाकरे यांनी 'आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकलं', असे म्हटले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.


CM Eknath Shinde | 'उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंनाही त्रास दिला', झी 24 तासच्या मुलाखतीत गौप्यस्फोट

CM Eknath Shinde Allegation Of Uddhav Thackeray Not Good With Anand Dighe


Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक

Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाहून विभव कुमार यांना अटक केली आहे. त्यांना दिल्लीतील सिविल लाइन्स पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आलं आहे. विभव कुमार यांचं म्हणणं आहे की, त्यांना माध्यमांमधून एफआयआरबाबत माहिती मिळाली. तसेच, विभव कुमार यांनीही ईमेल मार्फत दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विभव कुमार यांनी दिल्ली पोलिसांना त्यांनी केलेल्या तक्रारीचीही दखल घ्यावी, असं आवाहनही केलं आहे. तसेच, त्यांना कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचंही विभव कुमार यांचं म्हणणं आहे. स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्वाती मालीवाल यांचं म्हणणं आहे की, जेव्हा त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचल्या त्यावेळी त्यांच्यासोबत विभव कुमार यांनी गैरवर्तन केलं आणि त्यांच्यासोबत मारहाणही करण्यात आली होती. स्वाती मालीवाल यांच्या तक्रारींच्या आधारे दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरनंतर एम्समध्ये स्वाती मालीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्या रिपोर्टमध्ये हेदेखील सांगण्यात आलं आहे की, स्वाती डाव्या पायावर आणि उजव्या डोळ्याखाली जखमेच्या खुणा आहेत. स्वातीनं डोकेदुखी आणि मान ताठ असण्याचीही तक्रार केली आहे.


Indian Railway : संकटसमयी ट्रेनचा हॉर्न कसा वाजवतात? रेल्वे Horn च्या आवाजाचे अर्थ जाणून घ्या

Indian Railway : संकटसमयी ट्रेनचा हॉर्न कसा वाजवतात?


Yogi Adityanath: योगींच्या सभेने वातावरण बदलणार? डॉ. भामरेंच्या प्रचारार्थ आज मालेगावी दौरा

Yogi Adityanath Malegaon Sabha: भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज (दि. १८) मालेगावात जाहीर सभा होत आहे.


India GDP Growth: अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची बातमी, UN ने आर्थिक विकासदराचा अंदाज बदलला

UN on India Economic Growth: भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ पाहून जगभरातील रेटिंग एजन्सी चकित झाल्या आहेत. जगभरातील अर्थव्यवस्था आर्थिक आघाडीवर संघर्ष करत असताना भारतीय इकॉनॉमी मात्र सुस्साट वेगाने अग्रेसर आहे. अलीकडेच IMF आणि जागतिक बँकेने भारताच्या वाढीबाबत सकारात्मक रेटिंग दिले तर आता भारताचा वेग आम्ही विचार केला होता त्यापेक्षा अधिक वेगवान असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.


नितीन गडकरी श्री काळाराम चरणी लीन

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- केंद्रीय रस्ते, वाहतूक व राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांनी श्री काळाराम मंदिरात महापूजा, अभिषेक करून प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले. महंत सुधीर पुजारी यांनी प्रधान संकल्प सोडला. यावेळी महावस्त्र व प्रसाद देऊन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त गडकरी नाशिकला आले होते. त्यावेळी श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने …


मुस्लिमांबाबत मोदींची भूमिका दुतोंडी – मुजफ्फर हुसेन

आता खुद्द नरेंद्र मोदीच मुस्लिम समाजाविरोधात उघडपणे भूमिका मांडत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे, असे हुसेन यांनी सांगितले.


Devendra Fadnavis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे, पण अजित पवार दोषी नाहीत- फडणवीस

सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य आहे, पण अजित पवार दोषी नाहीत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, अशी स्पष्टोक्ती देखील फडणवीसांनी दिली. हेही पाहा सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे, जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचं म्हटलेलं नाही. आपल्याला यंत्रणा आणि त्यांच्या तपासाला सामोरे जावे लागते, असे म्हणाले होते. शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक शब्दात विचारणा केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना मंत्री करण्यापासून ते सोबत घेण्यापर्यंत भाजपचा मोठा विरोध होता. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा हे पंतप्रधानांनी सांगितलं. एवढे आरोप असलेल्या अजित पवारांना यापुढे सोबत घेऊ नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे. जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पंतप्रधान यांनी केलेला आरोप ग्राह्य धरायचा की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते ग्राह्य धरायचं? मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विभागाने मला ही माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मनसेकडून आज मुंबईत पंतप्रधानांची सभा बोलावली आहे. त्यामुळे किमान आज त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच आश्वासन दिलं पाहिजे. आम्ही ही लढाई सुरु केली होती, असेही त्यांनी सांगितले.


MPSC परीक्षेत 3 गुण पडले कमी, 25 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

नितीन नांदुरकर, जळगाव : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये अपयश आलेल्या तरुणाने जीवन संपवल्याची धक्क्दायक घटना जळगावमधील शिरसोली इथं घडलीय. तीन गुण कमी मिळाल्याने तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. आकाश भिमराव बारी असं २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.याबाबत मिळालेली माहिती अशी की, एमपीएससीच्या क्लर्कच्या परीक्षेत केवळ तीन गुण कमी पडल्याने, जळगाव...


Loksabha election 2024 | राऊतांचे शाब्दिक ताशेरे, आठवलेंच्या मार्मिक कविता... ऐका हो ऐका

Loksabha Election 2024 funny videos Aika Ho Aika


Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी

Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai News) सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील महायुतीची (Mahayuti) सांगता सभा आज दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजेरी लावणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष लागलं आहे. दरम्यान या सभेबद्दल आणि एकुणच सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल जनतेला नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.