बातम्या

Trending:


मृत्यूवर मात करणारा तारा

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांना एका अशा तार्‍याची माहिती मिळाली आहे ज्याच्याबाबत असे म्हटले जात होते की हा तारा नष्ट होऊन जाईल; मात्र अलीकडेच संशोधकांनी या तार्‍याबाबत पुन्हा जाणून घेतले असता, त्याच्याबाबत आश्चर्यकारक माहिती समोर आली. हा तारा केवळ बचावलाच आहे असे नाही तर त्याने आपल्या आकारात 150 टक्क्यांची वाढ करून एक विशाल आकार धारण केला आहे. या …


Amol Mitkari on Ajit Pawar : अजितदादा सक्तीच्या विश्रांतीवर, अमोल मिटकरी काय म्हणाले? ABP Majha

Amol Mitkari on Ajit Pawar: अजित पवार आजारी म्हणून महायुतीच्या सभांमध्ये सहभागी झाले नाहीत- मिटकरी. अजित पवार आजारी असल्याने महायुतीच्या प्रचार सभांमध्ये ते सहभागी झाले नसल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहेय. कुणाच्या प्रकृतीवरून होणारं राजकारण हे दुःखदायक असल्याची टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहेय. इतर महत्वाचे व्हिडीओ: Uddhav Thackeray On Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न, उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं! Uddhav Thackeray interview:PM मोदी 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत, शिंदे भाजपमध्ये विलीन होतील Pankaja Munde : बाबांसारखा संघर्ष माझ्याही वाट्याला आला.. फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंचं झंझावाती भाषण Marathwada Water Crisis Special Report : हंडाभर पाणी विकत घ्यावं लागतं... मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई


beed Loksabha Election: बीडमध्ये वाढलेलं मतदान कुणाचं? मुंडेंचं की सोनवणेंचं?

विलास बडे, प्रतिनिधीबीड: बीड लोकसभेची निवडणूक राज्यातील सर्वाधिक चर्चेतली निवडणूक आहे. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत सर्वाधिक मतदान हे बीडमध्ये झालं. तब्बल 70.92 टक्के इतकं. वाढलेलं हे मतदान नेमकं कुणाचं आहे? पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.अपेक्षेप्रमाणे बीड लोकसभेसाठी अतिशय घनघोर अशी लढाई झाली. त्याला पार्श्वभूमी होती मराठा आंदोलनाच्या धगीची. त्यानंतर उमटलेल्या हिंसक पडसादांची. समाजमाध्यमापासून ते गावखेड्यातील...


Snake : अ‍ॅनाकोंडा की टायटनोबोआ कोण आहे जगातील सर्वात मोठा साप?

मुंबई : जगात आजवर सापांच्या अनेक प्रजाती सापडल्या आहेत. त्यापैकी सर्वांत मोठा किंवा लांब साप कोणता याबाबत मात्र अनेकांचं दुमत आहे. कारण आजवर अ‍ॅनाकोंडा हाच सर्वांत मोठा साप असल्याचं मानलं जात होतं, मात्र टायटनोबोआ या सापाचा जीवाष्म सापडल्यानंतर याबाबत मतभिन्नता निर्माण झाली. मग सर्वांत मोठा साप कोणता, जाणून घ्या.सामान्य सापांपेक्षा मोठा साप म्हणजे अजगर असंच अनेकांना वाटतं, मात्र तसं नसून जगात सर्वांत मोठ्या सापांमध्ये अ‍ॅनाकोंडा व टायटनोबोआ या...


Maharashtra Weather News : पुन्हा संकट ओढावणार; राज्याच्या 'या' भागांना वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा

Maharashtra Weather News : कधी होणार मान्सूनचं आगमन? राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती की अवकाळीचं थैमान. पाहा हवामान विभागानं दिलेलं सविस्तर हवामान वृत्त


'अजित पवारांना थ्रोट इन्फेक्शन' उमेश पाटलांनी दिली माहिती

Umesh Patil informed that Ajit Pawar has a throat infection


Nashik Lok Sabha : कालचे दुश्मन आजचे दोस्त, तडजोडीचा योगायोग जुळून आला मस्त, राजकीय विरोधकांचे गळ्यात गळे

Nashik Lok Sabha : ‘राजकारणात कालचे दुश्‍मन आजचे दोस्त, आजचे दोस्त उद्याचे दुश्‍मन होऊ शकतात,’ याचा प्रत्यय सर्वत्र येत आहे. कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक एकमेकांचे प्रचार करताना दिसत आहेत.


Pune Hoarding Collapse : मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहरातही होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान

Pimpri Chinchwad Hoarding Collapses: पिंपरी चिंचवडमध्ये आज दुपारी होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना कोसळली.


तपास यंत्रणांना धडा

मात्र, ही बातमी येण्याआधीच सन २०२१ मध्ये भारतीय तपास यंत्रणांनी ‘न्यूजक्लिक’ला चीनकडून पैसा मिळत असल्याचा ठपका ठेवला होता. तेव्हा आणि नंतर न्यायालयातही पुरकायस्थ हे सातत्याने ‘न्यूजक्लिक’ला चीनकडून एक छदामही मिळालेला नाही,’ अशी भूमिका सातत्याने मांडत आहेत.


Shantigiri Maharaj Prachar : सायकलवरून प्रवास करत शांतिगिरी महाराजांनी शोधला प्रचाराचा नवा फंडा

Shantigiri Maharaj Prachar : सायकलवरून प्रवास करत शांतिगिरी महाराजांनी शोधला प्रचाराचा नवा फंडा नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, राजसत्तेला बळ देण्यासाठी धर्मसत्ता राजकीय आखाड्यात उतरल्याचा शांतिगीरी महाराजांचा दावा.


PM Modi Mumbai Road Show Full Video : सोमय्यांचा डान्स, लोकांची गर्दी! नरेंद्र मोदींचा UNCUT रोड शो

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संध्याकाळी पावणे सात वाजता मुंबईतल्या घाटकोपरमध्ये रोड शो (Narendra Modi Mumbai Ghatkopar Road Show) होणार आहे. भाजपचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी हा रोड शो होणार आहे. घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल जवळून मोदींच्या रोड शोला सुरुवात होणार असून घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ त्याचा समारोप होईल. यामुळे ईशान्य मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोसाठी घाटकोपरच का निवडण्यात आलं याला महत्त्वाचं राजकीय कारण आहे. मोदींच्या रोड शोचा परिणाम हा मुंबईतील सातपैकी पाच लोकसभा मतदारसंघांवर थेट पडणार आहे. मोदींचा रोडशो घाटकोपरमधेच का? पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत याच भागात रोड शो घेण्याचे अनेक कारणं आहेत. घाटकोपर हा साधारणपणे मध्यवर्ती मतदारसंघ आहे. पूर्व उपनगरं आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा म्हणून घाटकोपरकडे बघितलं जातं. इथल्या गुजराती आणि मराठीबहुल भागातील मतदारांना प्रभावित करणं हा सुद्धा एक उद्देश आहे. या रोड शोमुळे मिहिर कोटेचा यांच्या उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघासहीत मुंबईतील पाच मतदारसंघ जोडले जातात. पियुष गोयल लढत असलेल्या उत्तर मुंबईतील दहिसर, रविंद्र वायकरांच्या उत्तर पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी, आणि उज्वल निकम यांच्या उत्तर मध्य मुंबईतील साकिनाका-अंधेरी आणि दक्षिण मध्य मुंबईतील राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघातील चेंबूर, गोवंडी हा भाग जोडला जातोय. या परिसरावर मोदींच्या रोड शोचा प्रभाव राहील अशी भाजपची अपेक्षा असेल.


Uddhav Thackeray : भारत De-Modi-Nation होणार, उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी ABP Majha

मुंबई: भाजप हा संपलेला पक्ष आहे, त्यांना स्वतःची पोरं होत नाहीत किंवा नकली संतानही होत नाही, त्यामुळेच त्यांना इतर पक्ष फोडावे लागतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी झोपले नसल्याने त्यांच्या मेंदूला क्षीण आला असून पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईतील शेवटची सभा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. 4 जूननंतर शिंदे भाजपमध्ये विलीन होतील असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी 'एबीपी माझा'शी खास संवाद साधताना भाजपवर टीका केली. घाटकोपरमध्ये दुर्घटना घडूनही मोदींनी रोड शो केला उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. गद्दारांना आणि ज्यांनी गद्दारी करवली त्या दिल्लीतील शाहांनाही माफ करत नाही. जनतेत आक्रोश आणि सूडाची भावना असून गेली दहा वर्षे भाजपच्या जुमल्याला जनता कंटाळली आहे. घाटकोरपमध्ये दोन दिवसांपूर्वी दुर्घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतरही मोदींनी वाजत गाजत रोड शो केला. लोकांना कोणतीही कल्पना न देता मेट्रो बंद केली. त्यामुळे लोकांमध्ये भाजपविरोधात प्रचंड आक्रोश आहे."


ABP Majha Headlines : 6 PM : 16 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 6 PM : 16 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स मुंबई, पुणे, नागपूरमधील होर्डिंग्जचा एबीपी माझाकडून रिअॅलिटी चेक.. होर्डिंग्जचं कोट्यवधी रुपयांचं अर्थकारण समोर मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील महायुतीचे अनधिकृत बॅनर हटवले, नरेंद्र मोदींच्या अनधिकृत बॅनरवर निवडणूक आयोगाची कारवाई...शिवाजी पार्कवर उद्या मोदींची सभा... उद्या शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदी-राज ठाकरेंची सभा, अजित पवार सभेला उपस्थित राहणार तर अजित पवार खरंच आजारी असल्याचं शरद पवारांचं वक्तव्य शिवाजी पार्कवर उद्या होणाऱ्या मोदी आणि राज ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष, सभेची जोरदार तयारी सुरू नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी, माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही, मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या रोड शो वेळी ठाकरे गटाची घोषणाबाजी...धनुष्यबाण दाखवत मुख्यमंत्र्य़ांनी दिलं उत्तर...


Zero Hour Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मुख्य आरोपी भावेश भिंडे गजाआड

मुंबई : घाटकोपरमधील दुर्घटना (Ghatkopar Hording Collapsed) घडल्यानंतर याप्रकरणातील आरोपी भावेश भिंडे बेपत्ता आहे. भावेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची 7 पथकं आहे. वेगवेगळ्या भागात भिंडेचा पोलिसांकडून शोध सुरु असून भिंडे राज्याबाहेर पळाल्याचा संशय आहे. भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळले. त्यानुसार मुंबई पोलीसांची टीम तिथे पोहचली. मात्र त्यापूर्वीच भिंडे पसार झाला होता. घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अटकेच्या भीतीने भिंडेने पळ काढला आहे. भिंडेच्या मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळा येथे असल्याचे समजले. पोलिसांचे पथक लोणावळ्यात पोहचण्यापूर्वीच त्याने मोबाईल बंद केला. त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.


Mumbai Pune Expressway: आता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवास होईल सुकर, आयटीएमएसचे काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या अपडेट नुसार आता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवास सुकर होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या महामार्गावरील वाहतूक हायटेक पद्धतीने व्यवस्थापित करण्यासाठी हाती घेतले एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ITMS) बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या महामार्गावरील 95 कि.मी....