LIVE UPDATES : नवी मुंबईतील नाराज भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांची नाराजी दूर करण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. ज्यानंतर 12 राज्यांतील 94 जागांसाठी मंगळवारी 7 मे रोजी देशभरात मतदान होणार आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास राज्यात 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान होणार आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत मातब्बर नेत्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. 

एकिकडे राज्यात प्रचारतोफाची धग कमी झाली असली तरीही दुसरीक़डे मात्र राजकीय वर्तुळात चाललेली उलथापालथ आणि आरोप प्रत्यारोपांचं सत्र मात्र क्षणाक्षणाला वेगळी रुपं दाखवताना दिसत आहे.  

2024-05-06T01:33:04Z dg43tfdfdgfd