Trending:


Sharad Pawar | शरद पवार सोमवारी चिपळुणात येणार

चिपळूण शहर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे येत्या सोमवारी (दि. २३) चिपळूण दौऱ्यावर येणार असून, यावेळी बहादूरशेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीकच्या न.प.च्या स्वा. सावरकर मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. पाच वर्षांनंतर शरद पवार प्रथमच चिपळूण दौऱ्यावर येत असून, यावेळी ते समाजातील सर्व घटकांशी संवाद साधणा...


२०२९ मध्ये ‘एक देश एक निवडणूक’

कोविंद समितीच्या अहवालाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र सरकार संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याची शक्यता आहे.


कोल्हापुरात मिरवणुकीत ध्वनी नियमांचे उल्लंघन

यंदा विधानसभा निवडणुका असल्याने गणेशोत्सव वाजत गाजतच साजरा केला गेला. गणेश आगमनाच्या वेळी वाद्यांच्या भिंती उभारल्या होत्या. विसर्जन मिरवणुकीवेळी त्या पुन्हा होत्याच. मात्र त्या मोठ्या आवाजात वाजत असताना त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिवसभर दिसून आले होते.


Ajit Pawar on Sanjay Gaikwad : मर्यादा पाळा! Ajit Pawar यांनी भर सभेत संजय गायकवाडांना झापलं

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. अजित पवार यांचा फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह मजकूर असणारे फेसबुक पेज फॉलो करण्यात आल्याने पक्षाने याबाबत संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आज या संदर्भात सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट काढून जाणीवपूर्वक फेक न्युज पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे नोंद करुन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे. अजित पवार यांच्या अधिकृत फेसबुकचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक प्रतिमा हनन करण्याचा प्रकार सुरू आहे. अजित पवार यांच्या फेसबुक पेजबाबतचे ते वृत्त निराधार, धादांत खोटे, खोडसाळपणाचे आहे असेही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे.


Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार

Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार खेड तालुक्यातील भोस्ते घाटात सापडला एका पुरुषाचा सापळा, आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवरती लोंबकळणारी दोरी बुधवारी संध्याकाळी सापडली असतानाच आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील एका व्यक्तीला या ठिकाणी मृतदेह असल्याचे स्वप्न पडले, त्याने ते खेड पोलिसाना सांगितले आणि त्यावरुन हा रहस्यमय सापळा आणि कवटीचे गूढ उकलले आहे. अशीच नोंद पोलिसांच्या एफआयआर मधे सुद्धा करण्यात आली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे १७ सप्टेंबर २०२४ रोजी योगेश पिंपळ आर्या (३०) ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगांव येथे राहणारी व्यक्ती खेड पोलीस स्थानकात दाखल झाली. त्याने पोलिसांना सांगितले की, ‘मला वारंवार स्वप्न पडतात खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे.’ योगेश आर्या च्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत या भागाची पाहणी केली असता भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलिसांनी जवळ पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्टया बांधून त्याला टॉवेलने बांधून गळफास घेऊन अनोळखी व्यक्तीचे प्रेत खाली पडलेले दिसले. त्याच्या अंगात राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट आणि या पोषाखाच्या आत मानवी हाडे असल्याचे दिसून आले. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची आदिदास लिहिलेली सॅक सापडली. तर मृतदेहापासून ५ फुटावर एक कवटी सापडली. तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ ए आय आर कंपनीचे कळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र या व्यतिरिक्त जवळच्या सॅकमधे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नाही. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसाना करावा लागणार आहे. मात्र मृतदेहाची अवस्था पाहता तो बरेच दिवसाचा असावा असे असताना त्याची खबर स्थानिकांना न लागता थेट मृतदेहच सावंतवाडीतील एका युवकाला आपल्या मृत्यूची खबर स्वप्नात येऊन देतो आणि त्यावरून स्थानिक पोलीस मृतदेह शोधतात ही गोष्ट विचार करायला लावणारी, अचंबित करणारी आणि तितकीच खळबळजनक आहे. यातून आता कोणते गूढ खेड पोलीस उलगडतात याकडे खेड पोलिसांचे लक्ष लागून राहिले आहे.


Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन

Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन अनिल बोंडे आणि संजय गायकवाडांच्य़ बेताल वक्तव्याविरोधात नागपुरात काँग्रेसचं आंदोलन, व्हेरायटी चौकात काँग्रेसची घोषणाबाजी.


Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यानिमित्त शहरातील शाळांना सुट्टी .. बुलढाणा शहरातील १५ शाळांना सुटी देण्यात आलीय .. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी एस टी महामंडळाची सेवा .. ४०० एस टी बस ची व्यवस्था करण्यात आलीय. . महिलांना येण्यासाठी एस टी महामंडळाने केली व्यवस्था


Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 08 PM 19 Sep 2024

राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करणाऱ्या संजय गायकवाड यांचे अजित पवारांनी टोचले कान, बुलढाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यात गायकवाड यांचं नाव न घेता मर्यादा पाळण्याचा सल्ला मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजितदादांची तीव्र नाराजी, भाजप हायकमांडकडे तक्रार करणार विधानसभेच्या १६० जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, २ ऑक्टोबरनंतर पहिल्या ५० उमेदवारांच्या यादीचं टार्गेट मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावलेंची महामंडळावर बोळवण, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली मनसेच्या वरळी व्हिजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, मुंबईत राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर वर्षा गायकवाड यांची निदर्शनं झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाडांचे पोस्टर्स फाडले, काँग्रेसचा आरोप...तर अनेक काँग्रेस नेते झिशान सिद्दीकींवर बसरले काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खूश, नरेंद्र मोदींचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शाह यांचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी सह-आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्ह्याचा तांत्रिक तपास करायचा आहे हा पोलिसांचा युक्तिवाद कोर्टानं स्वीकारला बदलापूरमधील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणी ५०० हून अधिक पत्रांचं आरोपपत्र दाखल, सुनावणी कधी सुरू होते त्याकडे लक्ष गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात डॉ. अजित रानडेंची हायकोेर्टात याचिका, २३ सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करू नका, हायकोर्टाचे अंतरिम आदेश भंडाऱ्यातील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेत राडा.. सदावर्तेंनी बँकेतील पैसे घरी नेल्याचा विरोधकांचा आरोप तर विरोधकांच्या हातून बँक गेल्याने आरोप सुरु असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा.


Weather Update : बाप्पाच्या विसर्जनानंतर पाऊस सक्रिय, 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपानंतर महाराष्ट्रत पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे. हवमान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे.


तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? मुख्यमंत्री नायडूंच्या दाव्यानंतर खळबळ, आता समोर आला 'लॅब रिपोर्ट'

Tirupati laddus : यापूर्वीच्या वायएसआरसीपी सरकारने तिरुपतीच्या लाडूंमध्ये निकृष्ट दर्जाचे घटक आणि प्राण्यांची चरबी वापरून श्री वेंकटेश्वर मंदिरातील लाडूंच्या दर्जाशी तडजोड केल्याचा आरोप नायडू यांनी केला.


Nashik Recruitment fraud | आरोग्य विभागात बोगस भरतीचा प्रयत्न उधळला

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती असल्याची बनावट जाहीरात सोशल मिडियाद्वारे पसरवून बेरोजगारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या सतर्कतेमुळे बुधवारी (दि. १८) टळला. सदर जाहीरात वाचून अनेक बेरोजगार महापालिका आणि जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जमा झाले होते. अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याचे महापालिक...


Nandurbar News : नंदुरबारमध्ये दोन गटांत दगडफेक, पोलिसांच्या गाड्याही फोडल्या

Nandurbar : नंदुरबार शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. नंदुरबार मधील इलाही चौक माळीवाडा आणि मच्छीबाजार परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे.


Aaditya Thackeray PC : हिंदूंचा वापर फक्त राजकारणासाठी! आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Aaditya Thackeray on India vs Bangladesh : बांगलादेश क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिली कसोटी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाईल. दुसरी कसोटी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवली जाईल. यादरम्यान, या कसोटी सामन्याच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आजोबा बाळ ठाकरे यांच्या मार्गावर चालत क्रिकेट सामन्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात त्यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले. शेजारच्या देशात हिंदू समाज हिंसाचाराला तोंड देत असताना बांगलादेश क्रिकेट संघाला भारत दौऱ्यावर का येऊ देत आहे, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि बीसीसीआयला केला. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, भारतातील ट्रोल्स बांगलादेशमध्ये हिंसाचाराच्या नावाखाली द्वेष पसरवत आहेत तर बीसीसीआय आपल्या संघाचे आयोजन करत आहे. आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मिडियात सातत्याने सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या २ महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का?


Fish market | मच्छी मार्केटमध्ये खवय्यांची तुफान गर्दी !

मच्छी मार्केटमध्ये खवय्यांची तुफान गर्दी !


Mumbai Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पहिली झलक, ताशी 350 किमी वेगाने स्वप्ननगरीकडे धावणार

Mumbai Ahmedabad Bullet Train: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या ड्रीम रूटवर धावणार आहे. या मार्गावर वेगाने काम सुरू आहे. ही ट्रेन बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने धावणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण लांबी 508 किलोमीटर असून प्रकल्पाची एकूण किंमत 1.08 लाख कोटी रुपये आहे.


Crime News : एकतर्फी प्रेमातून विवाहितेला संपवले

एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गौरी लणेश आरे (वय 25, रा. कळस माळवाडी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. गौरी यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी (दि. 18) सकाळी साडेसात वाजता उपचारांदरम्यान गौरी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी विश्रांतवाडी प...


Nashik | जल्लोषात १२ तास चालली मिरवणूक

नाशिक : ढोल-ताशे, डीजेच्या दणदणाटात वाजत-गाजत नाशिककरांनी गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यावेळी गणेश भक्तांनी थिरकत, जयघोष करीत मुख्य विसर्जन मिरवणुकीत रंगत आणली होती. वाकडी बारव येथून सुरू झालेली मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक बारा तास जल्लोषात सुरू होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा जल्लोष, शिस्तबद्धता आणि समन्वय ...


बीडमध्ये भाजपसमोर आव्हान

गेवराईत आमदार लक्ष्मण पवार आणि अमरसिंह पंडित हे परस्परांचे साले-मेहुणे नात्यांमध्ये असून दोन्ही घराण्यातील राजकीय संघर्षाभोवती स्थानिक राजकारण फिरते.


Rupali Chakankar On Rohini Khadse : खडसे परिवारामध्ये कोण कुठल्या पक्षामध्ये तेच कळत नाही

मुंबई: भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेशही झाला होता. मात्र, यानंतर भाजपने (BJP) त्याबाबत घोषणा केलीच नाही. आता या सगळ्याला पाच महिने उलटून गेल्यामुळे मी भाजप प्रवेशाच्या विषयावर फुली मारली आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले होते. एकनाथ खडसे यांनी 'एबीपी'च्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना याबद्दल भाष्य केले होते. एकनाथ खडसे यांच्या मुलाखतीनंतर आता महाराष्ट्र भाजपमध्ये हालचाली दिसून येत आहेत. नाथाभाऊंचे कट्टर विरोधक असणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये सामावून घेण्याविषयी भाष्य केले आहे. एकनाथ खडसे मुलाखतीत काय म्हणाले, ते मी ऐकलं नाही. त्यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला मान्यच आहे. त्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करुन एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आता महाराष्ट्र भाजप एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कधी आयोजित करणार, हे पाहावे लागेल. तसेच एकनाथ खडसे भाजपचा हा प्रस्ताव स्वीकारणार का, हेदेखील बघावे लागेल.


मुंबई : हार्बर मार्ग विस्कळीत

हार्बर मार्गावरील चुनाभट्टी रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या समांतर रस्ता फाटक खुले राहिल्याने, लोकल सेवा खोळंबली.


Laxman Hake on Manoj Jarange : तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक, बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर

Lakshman Hake On Manoj Jarange: प्रत्येक आंदोलनात जरांगे वेगळी मागणी करत असून जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जीआर काढतो याची लाज वाटते असं म्हणत जरांगे तमाशातला सोंगाड्या आहे. जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या, यापेक्षा जरांगेंची लायकी नाही, असा टोला ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके (Lakshman Hake) यांनी लगावलाय. जालन्यातून ते बोलत होते. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उफाळून आला असून मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरु असतानाच ओबीसीही आक्रमक भूमिका घेताना दिसतायत. दरम्यान, मराठा आरक्षणाची भूमिका समजून घेण्यासाठी अंतरवली सराटीला गेलेल्या नेत्यांनाही लक्ष्मण हाकेंनी चांगलंच सुनावलंय. हैदराबाद गॅझेट ,सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला मुख्यमंत्र्याला कायदा कळतो का? असा सवालही त्यांनी केलाय.


Amaravati Textiles Park :उद्या अमरावती टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन, मोदींच्या हस्ते उद्या ई-भूमिपूजन

Textiles Park : उद्या अमरावती टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन, मोदींच्या हस्ते उद्या ई-भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर - विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना कीट वाटप कार्यक्रमास मोदी यांची उपस्थिती - पंतप्रधान मोदींसह राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांचे असणार उपस्थिती - वर्ध्यातील स्वावलंबी मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती - कार्यक्रमासाठी पन्नास हजार नागरिकांची असणार उपस्थिती - अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे मोदी यांच्या हस्ते होणार ई भूमिपूजन - 2250 पोलिसांचा असणार चौख बंदोबस्त.. - नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष .....


Maharashtra Breaking News LIVE: पंतप्रधान मोदींच्या विदर्भ दौऱ्यानंतर अमित शाहांचा मराठवाडा दौरा

विधानसभा निवडणुकींच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झालाय. पुण्यात विसर्जनाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करण्याची संख्या अधिक होती ..तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी प्रवास केला.राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.


Suspicious Death In Dhule : एकाच कुटूंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू

प्रवीण गिरासे (५२), पत्नी दीपांजली गिरासे (४७), मुलगे सोहम गिरासे (१८) आणि गितेश गिरासे (१४) अशी मृतांची नावे आहेत.


Mumbai Port Trust Recruitment 2024: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता, अर्जाची लिंक बातमीत

Mumbai Port Trust Recruitment 2024: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत काम करण्याची अनेकांना इच्छा असते. मुंबई पोर्ट ट्रस्ट ही एक प्रतिष्ठित संस्था आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध पदांची जागा उपलब्ध आहे. या जागा भरण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोर्ट ट्रस्टकडून करण्यात आले आहे.


केजरीवाल यांची खेळी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या रविवारी आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करून राजकीय वादळ निर्माण केले होते. मुख्यमंत्रिपद दोन दिवसांत सोडण्याचा निर्धारही व्यक्त करताना त्यानुसार ते पदावरून पायउतारही झाले. दिल्ली विधानसभेची मुदत फेब—ुवारी 2025 मध्ये संपत असली, ...


दादा म्हणाले, वाचाळवीरांनी मर्यादा पाळावी; नितेश राणेंचे चॅलेंज, अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या

मुंबई : वाचाळवीरांनी थोडीशी मर्यादा पाळावी, कुठेही वेडंवाकडं विधानं करून मुख्यमंत्री वा घटकपक्षांना अडचणीत आणू नये असं सांगत अजित पवारांनी वाचाळविरांना दम दिल्यानंतर आता महायुतीतून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. अजितदादांनी भाजपमधील वाचाळविरांची तक्रार दिल्लीतील वरिष्ठांकडे केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. तर अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. मुस्लिमांविरोधात सातत्याने...


MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna

अहमदनगर : उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, मी इथून संभाजीनगर ला जाणार असल्याचे सांगत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिर्डी येथील जुनी पेन्शन मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली. राज्यातील जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना जुनी पेन्शन योजना (Old Pension Yojana) आणि नवी पेन्शन योजनेबाबत भाष्य केले. तसेच, आतापर्यंत तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच केलं आहे. शालेय शिक्षण सेवकांना आपण लाभ दिला असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, दीपक केसरकर यांचे भाषण सुरू असताना काही उपस्थितांनी मध्येच उभे राहून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, जुनी पेन्शनची मागणी करत कार्यक्रमातून काढता पाय घेतला. येथील कार्यक्रमात पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, कमी अनुदान असणाऱ्या शिक्षकांना देखील मदत करण्यासाठी समिती नेमली आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल.पगाराच्या रकमेपेक्षा खर्च जास्त असल्याने यातून मार्ग काढू. केंद्र सरकार ने जाहीर केलेली पेन्शन योजना सर्वांना माहीत आहे. मात्र,याबाबत सम्रभ पसरविला जातोय. काही लोक इथे भाषण करून गेले असतील, ते सत्तेत असताना काही देऊ शकले नाहीत. मात्र, एकनाथ शिंदे यांना जबाबदारी समजते. एक सामान्य रिक्षावाला या पदावर बसला आहे, असे म्हणत नाव न घेता शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर केसरकरांनी हल्लाबोल केला.


Raigad Ropeway | किल्ले रायगड रोपवे दुपारी दोनपर्यंत पर्यटकांसाठी बंद, हे आहे कारण

नाते : पुढारी वृत्तसेवा एनडीआरएफच्या वतीने गुरुवारी (19 सप्टेंबर) रायगड रोप वे येथे मॉक ड्रिल (सुरक्षा सराव) आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे रोप वे दुपारी दोन वाजेपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रात रोपवे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रतिवर्षी शासनाच्या एनडीआरएफ या सुरक्षा पथकाकडून या परिसरात सुरक...


One Nation One Election: 'मोदी दर्शनाला गेले आणि गणपती पावला केजरीवालांना..', उल्हास बापट असं का म्हणाले?

Ulhas Bapat on PM Modi: 'वन नेशन वन इलेक्शन' या विषयावर बोलताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपती दर्शनासाठी दिलेल्या भेटीचा दाखला देत मार्मिक टिप्पणी केली आहे.


ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2024 | गुरूवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2024 | गुरूवार 1. महायुतीच्या जागावाटपाचं घोडं पुढे सरकलं, 168 जागांवर कोणताही वाद नसल्याची माहिती https://tinyurl.com/59ucwbvy विधानसभेच्या 160 जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, 2 ऑक्टोबरनंतर पहिल्या 50 उमेदवारांच्या यादीचं टार्गेट https://tinyurl.com/tk6ddecv 2. बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण अद्याप गुलदस्त्यात https://tinyurl.com/5dbphape...


CBSE Pattern In Maharashtra: राज्यातील शाळांतही आता CBSE पॅटर्न; या 'कॉपी'ने पास होऊ?

CBSE Pattern In Maharashtra: ‘सीबीएसई’ आणि ‘एसएससी’ शाळांमधील विद्यार्थ्यांमधील हा सामाजिक फरक दुर्लक्षून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य मंडळांच्या अभ्यासक्रमांकडे पाहणे आवश्यक ठरते.


Minor Girls Gangrape In Pune : बारामतीतील अल्पवयीन मुलींवर पुण्यात सामूहिक अत्याचार, तिघे अटकेत

आरोपींची मुलींशी ओळख होती. याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.


Indus Water Treaty: भारताने सिंधू जलवाटप कराराबाबत पाकिस्तानला बजावली नोटीस ; नेमकं प्रकरण काय?

Indus Water Treaty भारताने पाकिस्तानला सहा दशक जुन्या सिंधू जल करारावरून नोटीस बजावली आहे. हा करार दोन देशांमधील सिंधू प्रणालीतील सहा नद्यांच्या पाण्याच्या वाटपाचे नियमन करण्यासाठी तयार करण्यात आला होता.


मुंबई : घाटकोपरमध्ये तरुणाची हत्या

चौघांनी दोन तरुणांवर धारदार हत्याराने वार केले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून गुन्हे शाखेने याप्रकरणी चार आरोपींना अटक करून घाटकोपर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.


Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 Sept 2024

राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करणाऱ्या संजय गायकवाड यांचे अजित पवारांनी टोचले कान, बुलढाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यात गायकवाड यांचं नाव न घेता मर्यादा पाळण्याचा सल्ला मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजितदादांची तीव्र नाराजी, भाजप हायकमांडकडे तक्रार करणार विधानसभेच्या १६० जागांसाठी भाजप आग्रही, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती, २ ऑक्टोबरनंतर पहिल्या ५० उमेदवारांच्या यादीचं टार्गेट मंत्रिपदासाठी सूट शिवून तयार असणाऱ्या भरत गोगावलेंची महामंडळावर बोळवण, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची चर्चा, आदित्य ठाकरेंकडून खिल्ली मनसेच्या वरळी व्हिजनचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार, मनसेच्या संदीप देशपांडेंची माहिती, काका-पुतण्यामधल्या राजकारणाची मुंबईभर चर्चा राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, मुंबईत राहुल नार्वेकरांच्या घराबाहेर वर्षा गायकवाड यांची निदर्शनं झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाडांचे पोस्टर्स फाडले, काँग्रेसचा आरोप...तर अनेक काँग्रेस नेते झिशान सिद्दीकींवर बसरले काँग्रेसच्या भूमिकेमुळे पाकिस्तान खूश, नरेंद्र मोदींचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शाह यांचा घणाघात...काश्मीरमधल्या कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी सह-आरोपी चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्ह्याचा तांत्रिक तपास करायचा आहे हा पोलिसांचा युक्तिवाद कोर्टानं स्वीकारला बदलापूरमधील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणी ५०० हून अधिक पत्रांचं आरोपपत्र दाखल, सुनावणी कधी सुरू होते त्याकडे लक्ष गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरूपदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात डॉ. अजित रानडेंची हायकोेर्टात याचिका, २३ सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करू नका, हायकोर्टाचे अंतरिम आदेश भंडाऱ्यातील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेत राडा.. सदावर्तेंनी बँकेतील पैसे घरी नेल्याचा विरोधकांचा आरोप तर विरोधकांच्या हातून बँक गेल्याने आरोप सुरु असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा.