LATUR NEWS | मटका चालवणारे ७ जण लातूर जिल्ह्यातून तडीपार

लातूर- लातूर शहरातील व जिल्ह्यातील मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या लोकाविरुद्ध मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करून मटका जुगार चालवणाऱ्या वर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तथापि वेळोवेळी गुन्हे दाखल करून व प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही काहीजणांत काहीच सुधारणा होत नव्हती ही बाब गांभीयनि घेत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे लातूर शहरातील ७ जणांना लातूर जिल्ह्यातून तीन महिन्याकरिता तडीपार केले असून त्यांना लातूर जिल्ह्याच्या बाहेर नेऊन सोडण्यात आले आहे. संजय भानुदास गायकवाड, लक्ष्मण आप्पाराव वाघमारे, बंडू वसंत मादळे, (सर्व रा. बौद्ध नगर), नागनाथ हरिभाऊ मुंडे (रा. मजगे नगर), सागर किशोर सरवदे (रा. हडको कॉलनी), शब्बीर शेख, (अंजली नगर), व संजय श्रीमंत यादव, (रा. मोती नगर) अशी त्यांची नावे आहेत.

मटका जुगार खेळविणाऱ्या इतर २० लोकाविरुद्ध दाखल गुन्ह्याची परिस्थिती पाहता त्यांना सुधारण्यासाठी एक संधी म्हणून मानवीय दृष्टिकोनातून विचार करून त्यांना हद्दपार न करता त्यांच्याकडून सहा महिन्यासाठी प्रतिष्ठित जामीनदारासह चांगल्या वर्तुणुकीचे हमीपत्र घेण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलिस अमलदार प्रदीप स्वामी, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांनी सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे पाठविले होते. त्याचे अवलोकन करून पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी मंजुरी दिली. या कार्यवाहीमुळे अवैध धंदे करणाऱ्यांना जरब बसणार आहे.

2024-10-02T11:13:15Z dg43tfdfdgfd