KK EXPRESS : केके एक्सप्रेस ४ तास विलंबाने धावणार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

बंगळुरू-नवी दिल्ली केके एक्सप्रेस या रेल्वेने दिल्लीकडे जाणार्‍या सोलापुरकरांना रविवारी (दि. 22) त्रास सहन करावा लागणार आहे. कारण ही गाडी तिच्या निर्धारित वेळेपेक्षा तब्बल ४ तास उशिराने धावणार आहे. त्‍यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन कोलमडणार आहे. प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. (KK Express)

दरम्यान, मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील राहुरी-पडेगांव दरम्यान इंटरलॉकिंग, दुहेरीकरण आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या कामासाठी 19 ते 23 सप्टेंबर असा पाच दिवसांचा ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे सोलापूर विभागातून धावणार्‍या गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे. यात बंगळुरू-नवी दिल्ली केके एक्सप्रेस रविवारी आपल्या निर्धारित वेळेपेक्षा चार तास उशिराने सुटणार आहे.

तर 19 ते 21 सप्टेंबरला नवी दिल्ली-बंगळुरू एक्सप्रेस ही तिच्या निर्धारित वेळेपेक्षा संध्याकाळी 30 मिनिटे उशिराने सुटणार आहे. तसेच पुणे-हरंगुळ एक्सप्रेस 22 ते 23 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. हजरत निजामुद्दीन-हुबळी एक्सप्रेस 22 सप्टेंबरला मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-पुणे-मिरज-हुबळीमार्गे वळविली आहे. यशवंतपूर-अहमदाबाद एक्सप्रेस ही 22 सप्टेंबरला दौंड-पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-सुरत मार्गे वळविण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

2024-09-18T12:07:05Z dg43tfdfdgfd