JALGAON LOK SABHA | तालुकानिहाय ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचे वितरण सुरु

जळगाव :  पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्याला लागणारे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे भुसावळ येथील तहसील कार्यालयात गोदामात ठेवलेली आहेत. या सर्व मशीनचे वितरण तालुका निहाय सुरू झाले आहे. दि. 29 रोजी सकाळी जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, दुपारी बाराला रावेर. जामनेर. मुक्ताईनगर. भुसावळ विधानसभा क्षेत्रासाठी मतदान यंत्रांचे वाटप झाले.

यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणूक यांच्या प्रचाराने वेग पकडला असून प्रशासकीय यंत्रणाही आपापले कामे पूर्ण करण्याच्या मागे लागलेले आहेत. येत्या 13 मे ला मतदान होणार असल्याने प्रत्येक तालुका निहाय ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे प्रत्येक तालुक्याला वाटपाचे कामाला सुरुवात झालेली आहे. दि. 28 रोजी रविवारी कडेकोट बंदोबस्त चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, चोपडा, एरंडोल या पाच तालुक्यातील विधानसभा क्षेत्रासाठी मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुरलीकर, तहसीलदार नीता लबडे, नायब तहसीलदार अंगत असतकर प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार उपस्थित होते. या सर्व मतदान यंत्रांची वाहतूक एस टी महामंडळाच्या मालवाहू बसेसच्या मधून करण्यात येत आहेत व यावर बंदोबस्त बीएसएफ जवान व कमांडर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

हेही वाचा –

2024-04-29T07:56:42Z dg43tfdfdgfd