IRCTC CHARDHAM YATRA PACKAGE: कुटुंबासोबत द्या देवभूमीला भेट, या पॅकेजमध्ये फिरा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री

IRCTC Chardham Yatra Package: उत्तराखंडची चारधाम यात्रा सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या महिन्याच्या 10 तारखेपासून चारधाम यात्रा सुरू होत आहे. चारधाम यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Chardham Yatra) येतात. देश-विदेशातून भाविक येथे येतात. तुम्हीही या महिन्यात उत्तराखंडच्या चारधाम यात्रेला (Chardham Yatra) जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. कारण IRCTC ने चारधाम यात्रेसाठी़ (Chardham Yatra Package) एक विशेष हवाई टूर पॅकेज आणले आहे. याअंतर्गत तुम्ही एकाच पॅकेजमध्ये उत्तराखंडच्या चारही धाम मध्ये प्रवास (IRCTC Package) करू शकाल.

किती दिवसांचे आहे चारधाम पॅकेज?

IRCTC च्या या चारधाम विशेष पॅकेजचे नाव चारधाम यात्रा पॅकेज EX-मुंबई (WMA59) आहे . हे विशेष पॅकेज 11 रात्री 12 दिवसांसाठी आहे. IRCTC चे हे चारधाम विशेष पॅकेज महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथून या महिन्याच्या 11 तारखेला म्हणजेच 11 मे रोजी सुरू होईल. प्रवास मोड फ्लाइट आणि रोड असेल ज्यामध्ये मुंबई ते दिल्ली प्रवास स्पाइसजेटच्या फ्लाइटने केला जाईल.

कोणत्या ठिकाणांना भेट देता येणार?

IRCTC च्या या विशेष चारधाम पॅकेजमध्ये तुम्ही बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी, यमुनोत्री या ठिकाणी भेट देऊ शकता. तसेच या पॅकेजमधील राहण्याची व्यवस्था स्टँडर्ड हॉटेल/गेस्ट हाऊस/तंबूमध्ये असेल. याशिवाय या पॅकेजमध्ये तुम्हाला नॉन एसी टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये फिरवले जाईल. जेवणाच्या प्लॅनबद्दल सांगायचे तर या खास पॅकेजमध्ये तुम्हाला 11 नाश्ता आणि 11 डिनर मिळतील, तसेच पार्किंग शुल्क, टोल टॅक्स, जीएसटी या पॅकेजच्या किमतीत समाविष्ट आहेत.

किती आहे चारधाम यात्रा पॅकेजची किंमत?

या पॅकेजच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास सिंगल बुकिंगवर तुम्हाला 1,03,100 रुपये खर्च करावे लागतील, तर डबल शेअरिंगसाठी 72,600 रुपये आणि ट्रीपल शेअरिंगसाठी 66,800 रुपये मोजावे लागतील. याशिवाय 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी बेड घेतल्यास 49,500 रुपये, 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी बेड न घेतल्यास 40,300 रुपये आणि 2 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी बेड न घेतल्यास 23,300 रुपये खर्च करावे लागतील. तुम्ही हे स्पेशल एअर टूर पॅकेज बुक करण्याचा विचार करत असाल तर IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ते स्वतः बुक करू शकता.

2024-05-04T11:03:06Z dg43tfdfdgfd