HSC-SSC RESULT 2024 DATE: मोठी बातमी! 'या' तारखेपर्यंत लागणार दहावी-बारावी परीक्षांचा निकाल

HSC-SSC Result 2024 Update: निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यंदा दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचे नियोजन बोर्डाकडून करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी जवळपास पूर्ण झाली आहे. नव्वद टक्के उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या आहेत. त्यामुळे निकाल वेळेपूर्वी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दहावी आणि बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीकोणातून अतिशय महत्त्वाची समजली जाते. या परीक्षांमधील निकालावर विद्यार्थ्यांचे भवितब्य अवलंबून असते. त्यामुळे दरवर्षी या निकालीची विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मेपर्यंत बारावीचा आणि 6 जूनपूर्वी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानतंर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा लगेच जुलैमध्ये घेण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

यावर्षी निकाल वेळेत लावण्याचे नियोजन

अनेकदा वेगवेगळ्या कारणाने निकाल लावण्यास विलंब होत असतो. मात्र यावर्षी बोर्डाने निकाल वेळेत लावण्याचे नियोजन केले आहे. बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार बारावी परीक्षांचा निकाल यंदा 25 मेच्या आधी जाहीर केला जाऊ शकते. तसेच दहावीचा निकाल देखील यंदा लवकर जाहीर होणार आहे. यंदा 5 जूनपूर्वी 10वी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल लागण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी बारावीचा निकाल 25 मे रोजी लागला होता, तर दहावीचा निकाल 2 जूनला जाहीर करण्यात आला होता. यंदाही बारावीचा निकाल त्याचवेळी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर होईल, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल.

90 टक्के उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण

यावर्षी दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेण्यात आली, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते, तर 12 लाख विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बारावीच्या 90 टक्के उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे, तर दहावीच्या 85 टक्के उत्तरपत्रिका तपाण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण देखील नोंदवण्यात आले आहेत. बोर्डाकडून दररोज उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार लवकरच निकालाची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

निकाल कुठे पाहाल

दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तो पाहण्यासाठी तुम्ही बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वा भेट देऊन पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे परीक्षा आसन क्रमांक असणे आवश्यक आहे.

मागच्या वर्षी दहावीचा निकाल ( 2 जून)राज्याचा निकाल 93.83 टक्के

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक - 98.11 टक्के

नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी - 92.05 टक्के

मागच्या वर्षी बारावीचा निकाल (25 मे)राज्याचा निकाल - 91.25 टक्के

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक - 96.01 टक्के

मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी - 88.13 टक्के

2024-04-29T13:56:27Z dg43tfdfdgfd