HELICOPTER ACCIDENT : हवेतच लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरची धडक, 10 जणांचा मृत्यू

क्वाललांपूर : हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक होऊन दहा जणांचा मृत्ूय झाला आहे. मलेशियात ही घटना घडली असून दोन्ही हेलिकॉप्टर लष्कराची असल्याची माहिती समोर येत आहे. मलेशियाच्या लुमुटमध्ये ही दुर्घटना घडलीय. यात एकूण दहा जण पायलट होते. अपघातात कुणीही वाचलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.

मलेशियाच्या रॉयल मलेशियन नेवीचा वार्षिक कार्यक्रम आहे. त्यानिमित्त सराव सुरू असताना दोन्ही हेलिकॉप्टरची धडक झाली. रॉयल मलेशियन नेव्ही बेसवर सराव केला जात होता अशी माहिती मिळते. प्रवक्त्यांनी सांगितले की, अग्निशमन दलाचे कर्मचारी अपघात स्थळी दाखल झाले असून बचावकार्य राबवण्यात येत आहे.

लष्कराकडून याबाबत माहिती देताना सांगण्यात आलं की, दुर्घटनेत घटनास्थळी सर्वांचाच मृत्यू झाला आहे. त्यांची ओळख पटवण्यासाठी लुमुट आर्मी बेस रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात येत आहेत. दोन्ही हेलिकॉप्टरची हवेत धडक झाली. त्यानंतर जमीनीवर पडण्याआधी एका हेलिकॉप्टरने दुसऱ्या हेलिकॉप्टरचा रोटर कापला आणि ही दुर्घटना घडली.

2024-04-23T04:52:04Z dg43tfdfdgfd