GARUDA PURANA : अशी कर्म करणारे स्त्री पुरुष पुढच्या जन्मी बनतात सरडा, साप

गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांच्या वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत, अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो

या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. यामध्ये भक्ती, ज्ञान, शांतता, सदाचार, नि:स्वार्थी कार्याच्या महिमाबरोबरच यज्ञ, दान, तपश्चर्या, तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मांमध्ये सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतर ऐहिक फलांचे वर्णन केले आहे. याशिवाय आयुर्वेद, नीतिशास्त्र इत्यादी विषयांच्या वर्णनाबरोबरच मृत आत्म्याच्या शेवटच्या क्षणी करावयाच्या कृतींचे तपशीलवार वर्णन केले आहे. प्रबोधनाची चर्चा हा देखील त्याचा मुख्य विषय आहे.

गरूड पुराणात व्यक्तींच्या वर्तनाविषयीही माहिती देण्यात आली आहे. स्त्री आणि पुरूष यांचं समाजात वर्तन कसं नसावं, याबाबत गरूड पुराणात माहिती देण्यात आली आहे. स्त्री आणि पुरूष यांनी समाजात वाईट वर्तन केल्यास त्यांना पुढच्या जन्मी कोणता जन्म मिळतो याविषायीही गरूड पुराणात माहिती देण्यात आली आहे.

काय सांगतं गरूड पुराण?

  • गरुड पुराणानुसार स्त्रीचे शारीरिक शोषण करणाऱ्या पुरुषांना नरकात स्थान मिळते. तसेच असे पुरुष पुढच्या जन्मी ड्रॅगन बनतात असं गरूड पुराण सांगतं.
  • जे पुरुष आपल्या गुरूच्या पत्नीशी संबंध ठेवतात ते पुढील जन्मात सरड्याच्या रूपात जन्म घेतात.
  • गरुड पुराणानुसार असे पुरुष जे आपल्या मित्राच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवतात ते पुढील जन्मात गाढव बनतात.
  • गरुड पुराणानुसार जे पुरुष स्त्रियांचा आदर करत नाहीत, त्यांना मारहाण करतात, शिवीगाळ करतात, ते पुढच्या जन्मात नपुंसक होतात.
  • अशी विवाहित स्त्री जी इतर पुरुषाशी संबंध ठेवते तिला नरकयातना भोगाव्या लागतात आणि अशी स्त्री पुढील जन्मात सरडा, साप किंवा वटवाघळाच्या रूपात जन्म घेते.
  • नरकाच्या यातनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मनुष्याच्या रूपात पुन्हा जन्म घेण्यासाठी मनुष्याने जीवनकाळात नेहमी सत्कर्म केले पाहिजे. यासोबतच गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे.
  •  

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

2023-05-26T02:13:30Z dg43tfdfdgfd