Trending:


क्रोएशियात सापडले 2500 वर्षांपूर्वीचे हेल्मेट

लंडन ः क्रोएशियातील पुरातत्त्व संशोधकांना उत्खननात तब्बल 2500 वर्षांपूर्वीच्या इलिरियन हेल्मेटचा म्हणजेच शिरस्त्राणाचा शोध लागला आहे. गोमाईल आर्कियोलॉजिकल साईटवर एका दफनस्थळी विशिष्ट अशा दगडी रचनेत हे हेल्मेट ठेवलेले होते. त्यावरून ते अर्पण केलेले असावे, असे संशोधकांना वाटते. हे हेल्मेट इसवी सनापूर्वीच्या सहाव्या शतकाच्या अखेरच्या काळातील ते इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील असावे. झाग्रेब युनिव्हर्सिटीच्या …


TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 May 2024 : ABP Majha

TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 May 2024 : ABP Majha शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार. सोलापूर जिल्ह्याचे पाण्याचे स्रोत आटले, सीना नदीचं पात्र कोरडं ठाक, अक्कलकोटमध्ये १५ दिवसाआड पाणी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर, ४० टक्के शोधकार्य अजूनही शिल्लक, कित्येक तास लागण्याचा अंदाज पक्ष फुटले तेव्हा ते झोपले होते का?, ज्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, ते देश काय सांभाळणार?.. एबीपी नेटवर्कला दिलेल्या एक्स्ल्युझिव्ह मुलाखतीत पंतप्रधान मोदींची ठाकरे आणि पवारांवर खरमरीत टीका..


IRCTC Himachal Package: बॅग भरा आणि मित्रांसोबत चला शिमला-मनालीला; 8 दिवसांचं जबरदस्त पॅकेज लॉन्च

IRCTC Himachal Package: उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी तुम्ही कुठे हिल स्टेशनला फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण आम्ही येथे तुम्हाला आयआरसीटीसीच्या एका खास आणि बजेट पॅकेजची माहिती देत आहोत. तुम्ही मित्रांसोबत, कुटुंबासोबत आणि पत्नी किंवा गर्लफ्रेन्डसोबतही या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.


मुंबई : फलक झाडांच्या मुळावर

महापालिका आणि रेल्वेच्या हद्दीतील हे अनेक ठिकाणी फलकांसाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची बेमालुमपणे छाटणी करण्यात येत आहे.


धाराशिव शहरातील अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई

महाराष्ट्र राज्य शासनाने परिपत्रक काढून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका भागातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे परिपत्रक काढले आहे.


‘हॅलो’ला कठोर उत्तर!

‘प्रमोशनल कम्युनिकेशन’ आणि ‘ट्रॅन्झॅक्शनल कम्युनिकेशन’ हे अधिकृत मार्गानेच व्हायला हवे. तसे होत नसल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 15 May 2024

Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 15 May 2024


Leopard News | जुन्नरला चाळकवाडी वामनपट्टा येथे बिबट्या जेरबंद..

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : वामनपट्टा चाळकवाडी( पिंपळवंडी ता.जुन्नर) येथील दत्ताजी बाबाजी वामन यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली. पकडलेला बिबट्या नर असून त्याचे वय सुमारे तीन ते चार वर्षाचे असावे. या भागातील जेरबंद करण्यात आलेला हा सहावा बिबट्या आहे,त्याला माणिक डोह येथील निवारा केंद्रात ठेवण्यात आले …


लोकसभेच्या आखाड्यातच महापालिकेच्या गटपार्ट्या

कोल्हापूर : लोकसभेच्या आखाड्यात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार ताकद आमजावत असतानाच कोल्हापुरात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भागाभागात महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला. महापालिकेची निवडणूक कधी होईल, याची अनिश्चितता असली तरी आता मागे राहून चालणार नाही, याची जाणीव झालेल्या इच्छुक उमेदवारांनी आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. कोल्हापूर महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू झाल्यापासून …


ॲलर्जीची कारणे शोधताना…

खाऊ म्हटलं की चॉकलेट, पेढे, कुकीज हा पहिला पर्याय असतो. पण आमच्याकडे कोणी असं काही आणलं तर त्यांना आदराने नको म्हणून आम्हाला ॲलर्जी असल्याचं सांगतो.


Mumbai Pune Expressway: आता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवास होईल सुकर, आयटीएमएसचे काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या अपडेट नुसार आता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवास सुकर होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या महामार्गावरील वाहतूक हायटेक पद्धतीने व्यवस्थापित करण्यासाठी हाती घेतले एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ITMS) बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या महामार्गावरील 95 कि.मी....


Mahadev Bet App: महादेव ॲप बेटिंग प्रकरणाची पाळेमुळे पुण्यात! नारायणगाव येथून ७० ते ८० जणांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई

Mahadev Bet App : महादेव ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगाव येथे मोठी कारवाई केली आहे. एका इमारतीतून बेटिंग होत असल्याचे पुढे आले असून पोलिसांनी ७० ते ८० जणांना अटक केली आहे.


हवामान संकटावर ‘एआय’चा उतारा

Global Warming: जागतिक तापमानवाढीवर मार्ग काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान साह्यभूत ठरणार आहे. जगात त्याचा वापरही सुरू झाला आहे आणि त्याचे परिणाम दिलासादायी आहेत.


Anil Desai Opposed by Congress : अनिल देसाईंसह काँग्रेस कार्यकर्त्यांची बाचाबाची, वाद चव्हाट्यावर!

मुंबई : मुंबईतील महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसून येतंय, मविआमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई चेंबूर पांजर पोळ परीसरात प्रचारासाठी आले असताना स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि बाचाबाची करत त्यांना निघून जाण्यास सांगितले. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हे ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेत आहेत. चेंबूरमधील पांजर पोळ या ठिकाणी ते गेले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि अनिल देसाईंच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला. अनिल देसाईंनी या ठिकाणाहून निघून जावं, त्यांनी या ठिकाणी प्रचाराला येऊ नये अशी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्यानंतर दोन्ही गटामध्ये काहीवेळ बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.


ESIC Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा निगम रुग्णालयात नोकरीची संधी, अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

ESIC Recruitment 2024 : ESIC मध्ये रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या असून, येथील ज्येष्ठ निवासी पदे भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार ESIC रिक्त पदांशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील येथे पाहू शकतात.


स्लोवाकियाचे पंतप्रधान गोळीबारात गंभीर जखमी

या घटनेतील संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. स्लोवाकियाच्या पार्लमेंटच्या डेप्युटी स्पीकरनी या घडामोडींची पुष्टी केली आहे.


PM Modi Mumbai Roadshow: पंतप्रधान मोदींचा आज मुंबईत रोड शो, हे रस्ते बंद राहणार

PM Modi Road Show Effects on Mumbai Traffic: पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज मोदींचा मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो होणार आहे. सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी हो रोड शो सुरू होणार असून 7 वाजून 45 मिनिटांनी संपणार आहे. यामुळे मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. काही महत्वाचे रस्ते बंद राहणार आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊयात...


Rahul Shewale On Uddhav Thackeray | 'धारावी मॉडेल'वरून जुंपली; शेवाळेंचा आरोप

Rahul Shewale On Uddhav Thackeray | Jumpli from 'Dharavi Model'; Accusation of algae


Ahmednagar Water Shortage : अहमदनगरमध्ये पिण्याचं पाणीही विकत घेण्याची वेळ, नागरिकांचं आंदोलन

Ahmednagar Water Shortage : अहमदनगरमध्ये पिण्याचं पाणीही विकत घेण्याची वेळ, नागरिकांचं आंदोलन अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांवर सध्या पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ आलीय. प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात ३१२ टँकर सुरु करण्यात आले आहेत. सर्वाधिक ९९ पिण्याच्या पाण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत, मात्र पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील ५ ते ५ दिवस येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. दरम्यान पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव इथल्या नागरिकांनी पाण्यासाठी थेट तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केलं. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं.


Chandrashekhar Bawankule Meet Raj Thackeray : चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

महायुतीकडून राज ठाकरेंवर मोठी जबाबदारी? बावनकुळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट मुंबईसाठी महायुतीची काय रणनीती? मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी


Aaditya Thackeray Full Speech Dadar : शब्द देतोय, UAPA लावणार, अटक करणार, सरवणकरांना इशारा

Aaditya Thackeray Full Speech Dadar : शब्द देतोय, UAPA लावणार, अटक करणार, सरवणकरांना इशारा Aaditya Thackeray on Sada Sarvankar दादर, दक्षिण मध्य मुंबई : "आज मी इथून आमदारांना (सदा सरवणकर) सांगत आहे. आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत तुम्ही बंदुक काढली. तुमच्यावर अतिरेक्याचा कायदा युएपीए मी टाकणार आहे. तुम्हाला सोडणार नाही. पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही फायरिंग केलंय. तु्म्ही पोलिसांवर फायरिंग केलं, तुम्हाला अतिरेक्यासारखं आतमध्ये टाकणार आहे. हा मी तुम्हाला शब्द देतोय", असा इशारा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दादरचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना दिला. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे ठाकरेंचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. ध्रुव राठींसारख्या लोकांनी याचं सगळं समोर आणलं आदित्य ठाकरे म्हणाले, ही निवडणूक (सदा सरवणकर) त्यांची नाही. त्यांना महत्व द्यायचे नाही. त्यांना इशारा पुरेसा आहे. गेल्या दहा वर्षात महागाई वाढत गेली. प्रधानमंत्री आवास योजनेत कोणाला घरं मिळाली नाहीत. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देतील असे आश्वासन दिले होते, मात्र एकाच्याही खात्यात आले नाहीत. त्यांच्या खात्यात 50 खोके आले असतील. आपल्याकडे काही 15 लाख आले नाहीत. खोटं बोला रेटून बोला, खोटं बोला रडून बोला, हे यांचे धोरण आहे. ध्रुव राठींसारख्या लोकांनी याचं सगळं समोर आणलं आहे. आपल्या व्हाट्सअॅपवर येऊ लागलं आहे.


Prakash Ambedkar : ठाकरे आणि शिंदेंमध्ये समझोता, प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक आरोप

Prakash Ambedkar : ठाकरे आणि शिंदेंमध्ये समझोता, प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक आरोप उबाठा सेनेने त्यांचा उमेदवार लढणार आहे की नूरा कुस्तीचा आहे एवढे सांगावं. "एकनाथ शिंदे आणि उबाठा सेना या दोघांमध्ये समझोता झालाय. निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका" अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी म्हणाले उद्धव ठाकरे अडचणीत आले, तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही, उबाठा सेनेने भाजप सोबत समझोता केलाय. काँग्रेसने देखील उबाठा सेनेपासून फारकत घेतली ते यांचा प्रचार करत नाहीत. काँग्रेसला लक्षात आलं, की उबाठा सेनेने आपल्याला फसवलं असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर कल्याण लोकसभेचे वंचित चे उमेदवार डॉक्टर शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचार सभेसाठी उल्हासनगर मध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजपसह उद्धव ठाकरेंवर देखील घणाघाती टीका केली.


Maharashtra Politics: फिर से खेला होबे! 4 जूननंतर पुन्हा राजकीय भूकंप, शरद पवार गट आणि ठाकरेंचा गट फुटणार: मोहित कंबोज

मुंबई: राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडत आहे. यानंतर राजकीय वर्तुळाला साहजिकच 4 जूनच्या निकालाचे वेध लागली. मात्र, त्यापूर्वी भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. कंबोज यांनी ट्विट करुन महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे...


Monsoon 2024 Updates : केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता

Monsoon 2024 Updates : केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता दरवर्षी 1 जूनला केरळात दाखल होणारा नैऋत्य मोसमी मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेतकऱयांसाठी ही आनंदवार्ता असून उकाडय़ापासूनही लवकरच सुटका होणार आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी मान्सून 4 जूनला केरळात दाखल होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात मान्सून 8 जूनला दाखल झाला होता. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. 2022 मध्ये 29 मे 2021 मध्ये 3 जून 2020 मध्ये 1 जून तर 2019 मध्ये 8 जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता.


Loksabha election | बारामतीबाबत संभ्रमच! कोणता मुद्दा ठरणार वरचढ?

बावडा : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाकडे देशातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत जनतेने भावनिक लाटेला पसंती दिली की विकासाच्या मुद्द्याला उचलून धरले? याबाबत मतपेटीत मतदारांनी दिलेल्या संभाव्य कौलाबाबत राजकीय अभ्यासकही संभ्रमात पडलेले दिसून येत आहेत. मात्र, सध्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार व महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांकडून विजयाचे दावे …