CHANAKYA NITI: चाणक्य नीती, 'या' ४ गोष्टींना साथ द्याल तर अडचणी संपणार नाही

मूर्खशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च।

दुःखितैः सम्प्रयोगेण पण्डितोऽप्यवसीदति॥

आचार्य चाणक्यांनी माणसाचे चांगले आणि वाईट कशात आहे ते सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी तुमच्यासाठी काय चांगले आहे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे याबद्दल पुरेसे ज्ञान दिले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की जर एखादी व्यक्ती या ४ गोष्टींपासून दूर राहिली नाही तर त्याला नेहमीच संकटांनी घेरले जाते. चला पाहूया कोणत्या आहेत या ४ गोष्टी.

मूर्ख शिष्याला काहीही सांगणे

आचार्य चाणक्य असे मानतात की, मूर्ख शिष्याला उपदेश करून काही फायदा होत नाही. त्याला पाहिजे तेच तो करतो. इथे मूर्ख शिष्याचा अर्थ असा आहे की, ते कोणाचेच ऐकून घेत नाहीत. जे कोणाचेही ऐकत नाहीत त्यांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान देणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे आणि जे अशा मूर्खांच्या मागे आपला वेळ वाया घालवतात ते नेहमीच अडचणीत सापडतात.

दुष्ट स्त्री

आचार्य चाणक्य यांनी अशा महिलांना चुकीचे मानले आहे जे केवळ स्वतःचे काम बघतात आणि कुटुंबाकडे पुरेपुर दुर्लक्ष करतात. ज्या महिला आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन चालत नाहीत, अशी स्त्री स्वत:मध्ये जगणारी असते ती इतरांचा तीळमात्रही विचार करत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. पती, मुले आणि आई-वडिलांचा अजिबात विचार न करणार्‍या अशा महिलांपासून चार हात लांब राहणे हुशारीचे आहे. अशा स्त्रिया स्वतःचे तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्यांचेही नुकसान करतात.

आर्थिक संबंधी

असे लोक जे नेहमी फक्त पैशाचा विचार करतात, म्हणजेच त्यांना फक्त पैसा गमावण्याची भीती असते आणि यामुळे ते अत्यावश्यक कामात गरज असूनही खर्च करत नाही. अशा लोकांना नेहमी संकटांनी घेरलेले असते कारण ते आपली संपत्ती चांगल्या कामात खर्च करू शकत नाहीत. अशा लोकांचा पैसा ते गेल्यानंतर इतर लोक वापरतात. म्हणूनच व्यर्थ खर्च करू नका, परंतु आवश्यक तेथे खर्च करा.

दु:खी व्यक्ती

आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, अशा लोकांपासूनही आपण अंतर ठेवले पाहिजे जे नेहमी दुखी राहतात आणि नेहमी नकारात्मक विचार करतात, नकारात्मक गोष्टी बोलतात, अशा लोकांसोबत राहिल्याने नकारात्मकता तुमच्यावर वर्चस्व गाजवू लागते आणि तुम्ही काहीही चांगले विचार करू शकत नाही. म्हणूनच नेहमी दु:खाबद्दल बोलणाऱ्या अशा लोकांपासून दूर राहणेच हुशारीचे आहे.

2023-05-26T05:58:00Z dg43tfdfdgfd