ASSEMBLY ELECTION 2024 : इतिहास 'युती'चा !

शिवसेना आणि भाजप युतीचा इतिहास रोमांचक आहे. तुटूनही कोणत्या ना कोणत्या मागनि पुन्हा हे दोन्ही पक्ष एकत्र आले. या दोन्ही पक्षांनी २०१४ मध्ये निवडणुका स्वतंत्रपणे लढल्यानंतर एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. मात्र, २०१९ मध्ये एकत्र लढूनही सत्तेतील वाट्यावरून बिनसले. त्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यामुळे युती झाली...(Assembly election 2024)

Assembly election 2024 :  युतीचे टप्पे

  • भाजप-शिवसेनेने युतीवर १९८९ मध्ये शिक्कामोर्तब केले. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा यात मोठा वाटा होता. युतीत त्यावेळी शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होती.

  • शिवसेनेने १९९० च्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १८३ जागा लढवल्या अन् मित्रपक्षांनाही आपल्याच कोट्यातून जागा दिल्या. १९९५ च्या निवडणुकीतही हाच फॉर्म्युला कायम राहिला. भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली..

  • १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत या फॉर्म्युल्यात काहीसा बदल करण्यात आला. यामागचं कारण म्हणजे बाळासाहेबांचा ९ हा लकी नंबर सांगितला जातो. शिवसेनेने १७१ आणि भाजपने ११७ जागांवर निवडणूक लढवली.

  • २००९ मध्ये शिवसेनेने १६९ आणि भाजपने ११९ जागांवर निवडणूक लढवली; पण राज्याची सत्ता सलग तिसऱ्यांदा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हाती .गेली

  • २०१४ ची निवडणूक शिवसेना आणि भाजपने वेगवेगळी लढवली. शिवसेनेने ६३ आणि भाजपने १२२ जागा जिंकल्या. पण शिवसेनेने नंतर भाजपला पाठिंबा देऊन सत्तेत सहभाग घेतला.

  • २०१९ च्या निवडणुकीत युतीत भाजपने १६४ आणि शिवसेनेने १२४ जागा लढवल्या. मात्र, सत्तेतील वाट्यावरून भाजपसोबत बिनसले. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली अन् उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

  • • उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवारांसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय न रुचल्याने एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसोबत बाहेर पडले आणि भाजपच्या मदतीने ३० जून २०२२ रोजी सत्ता स्थापन केली. अशारीतीने पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र आले.

काँग्रेससोबत नातं काय ?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. कट्टर काँग्रेसविरोधी पक्ष अशी शिवसेनेची ओळख होती. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला बाळासाहेबांनी पाठिंबा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांनी शिवसेनेचा एकही उमेदवार निवडणुकीत उतरवला नाही.

2024-10-02T10:13:08Z dg43tfdfdgfd