AMOL KOLHE VS ADHALRAO PATIL : अमोल कोल्हेंकडून आढळरावांची सरड्याशी तुलना, आता आढळरावांकडून कोल्हेंना पोपटाची उपमा!

घोडेगाव, शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील (Adhalrao Patil) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या मागील काही दिवसांपासून चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यात एकमेकांना अनेक प्रकारच्या उपमादेखील दिल्या जात आहे.   सरड्यासारखा रंग बदलता, असं अमोल कोल्हे आढळराव पाटलांना म्हणाले होते. त्यावर आता आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर देत त्यांना पोपटाची उपमा दिली आहे. 

आढळराव पाटील म्हणाले, अमोल कोल्हे फक्त पोपटासारखं बोलतात. मतदारसंघात मीच सगळं केलं, असं सांगतात. काम करणं आणि अभिनय करणं यात मोठा फरक आहे. मी कामं करतो, हे फक्त अभिनय करतात. यांनी कोणते कामं केले ते दाखवावे. आता स्वाभिमान आणि सहानुभूतीबाबत बोलतील. मला सांगा या खासदाराला कसली सहानुभूती आली. गावागावांत या खासदारांना अडवलं जातंय, तुम्ही आमची फसवणूक केल्याचा आरोप करतात. ही वस्तुस्थिती आहे, असंही ते म्हणाले. 

वाहतूक कोंडी आणि इतर प्रश्न मांडत 2019 च्यावेळी निवडून आले. मतं मिळवली. मात्र एवढे वर्ष काहीही काम केलं नाही. आताही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. मी केंद्रात गेलो तरचं चाकणची वाहतूक कोंडी सुटेल त्यासोबतच बाकी प्रश्नदेखील थेट सोडवणार असं आश्वासन त्यांनी घोडेगावकरांना दिलं आहे. ज्या उमेदवाराने पाच पक्ष बदल बदलले. फडणवीसांनी ही मला सांगितले, कोल्हेनी भाजपचे दार ठोठावले. त्यामुळं कोल्हेंनी निष्ठेबद्दल बोलू नये, असाही घणाघात त्यांनी केला आहे. 

सरड्या पेक्षा पटकन रंग बदलला: अमोल कोल्हे

अमोल कोल्हे म्हणाले होते की, शिवाजी आढळरावांनी सरड्या पेक्षा पटकन रंग बदलला. त्यांच्या या भूमिकेने सगळे सरडे संपावर गेले असावेत. अशी तिरकस टीका अमोल कोल्हेनी केली. कोल्हे मला आव्हान-प्रतिआव्हानामध्ये गुंतवून ठेवण्याचा डाव करतायेत. त्यामुळं यापुढं मी कोल्हेना प्रतिउत्तर देणार नाही. आढळरावांनी ही भूमिका घेतल्यानंतर कोल्हेनी त्यांना सरड्याची उपमा दिली होती. शिरूर लोकसभेतील कोल्हे-आढळरावांमधील आव्हान-प्रतिआव्हानाच्या नाट्याने असा नवा रंग घेतला आहे. सुरुवातीला आढळरावांनी कोल्हेंना आव्हान दिलं, मग कोल्हेनी आढळरावांना प्रतिआव्हान दिलं. पुरावे द्या अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडा, यावरून दोघांमध्ये खडाजंगी सुरू आहेच. त्यातच आता अमोल कोल्हेंना पोपटाची उपमा दिली आहे. यावर अमोल कोल्हे काय प्रत्युत्तर देतात?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

Sharad Pawar: शरद पवार इज बॅक, 84 वर्षांचा योद्धा पुन्हा लढाईत उतरणार, पुढच्या तीन दिवसांत दौरे आणि सभांचा धडका

Sunil Shelke Vs Rohit Pawar : सुनिल शेळकेंचे रोहित पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले मटण अन् मतांना दोन हजार...

2024-05-08T09:37:35Z dg43tfdfdgfd