महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई, 1 जून : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. शरद पवार अचानक शरद पवारांच्या भेटीला गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीचं नेमकं कारण काय आहे, याबाबत अजूनही माहिती मिळू शकलेली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच वर्षा बंगल्यावर त्यांना भेटायला गेले आहेत.

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात भेटीगाठींचा सिलसिला वाढला आहे. दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. या दोघांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली, पण ही भेट अराजकीय असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते.

2023-06-01T14:09:22Z dg43tfdfdgfd