सांगली : पुढारी वृत्तसेवा
शहरात सोमवारी रात्री मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. शहरातील अनेक रस्त्यांवर तसेच सखल भागात मोकळ्या जागी पाणी साचले होते. रात्री दहानंतर वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे सारे शहर अंधारात होते.
Mumbai Rain | परतीचा पाऊस बिघडवणार मुंबईकरांचे आरोग्य !सोमवारी रात्री पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत होता. जोराच्या पावसामुळे महावितरणकडून शहराचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. रात्री पावणेअकरा वाजले तरी तरी पाऊस सुरू होता. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर थोडा कमी झाला. ढगांचा गडगडाट सुरूच होता. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. सखल भागात मोकळ्या जागेत पाणी साचून राहिले होते. पावसामुळे उपनगरांची दैना झाली. अनेक ठिकाणी रस्ते चिखलमय झाले.
2024-10-01T02:12:32Z dg43tfdfdgfd