बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
पत्नीला नेण्यासाठी सासुरवाडीला गेल्यानंतर भावोजी व दोन मेहुण्यांमध्ये वादावादी झाली. यातून एकमेकांवर खुनीहल्ला केल्याची घटना मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास बेनकनहळ्ळी येथे घडली. याप्रकरणी भावोजी तसेच दोघा मेहुण्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परस्परविरोधात वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
OBC Reservation : भांडण मराठ्यांचे, बळीचा बकरा ओबीसी : प्रकाश आंबेडकरयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संपत निलजकर (रा. मुजावर गल्ली, बेळगाव) याच्या पत्नीची महिन्यापूर्वी प्रसूती झाली आहे. पत्नी घरी येईल म्हणून तो प्रतीक्षा करून सोमवारी रात्री सासुरवाडीला पत्नीला आणण्यासाठी गेला होता. परंतु, महिना उलटून गेला तरी भावोजींनी आपली बहीण व बाळाची साधी विचारपूसही केली नाही, याचा राग मेहुणा सचिन फडके व सूरज फडके यांना होता. यातून मंगळवारी पहाटे त्यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली या वादावादीतून सचिन व सूरज या दोघांनी कोयत्याने संपतवर वार केले. यावेळी चिडलेल्या संपतनेही त्यांच्याच हातातील कोयता घेऊन पलटवार केला. यामध्ये संपतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेत सचिन व सूरज हेदेखील जखमी झाले आहेत.
बिग बॉस मराठी : मीरा-स्नेहा यांच्यामध्ये जोरदार भांडणघटनेची माहिती मिळताच वडगावचे उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी हे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून रुग्णालयात असलेल्या तिघांकडून जबाब घेतला. यानंतर दोन्ही बाजूंनी दिलेल्या फिर्यादीनुसार परस्परविरोधात खुनीहल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक जोडट्टी तपास करत आहेत.
2024-10-02T01:57:12Z dg43tfdfdgfd