पीओके भारतात सामील व्हावा

पाकव्याप्त काश्मिरातील बहुतांश लोकांनी भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने पीओकेतील लोकांसोबत मोबाईलद्वारे संभाषण करून त्यांची मते आजमावून घेतली. इन्शाअल्लाह... व्याप्त काश्मीरवर हिंदुस्थानची हुकूमत येण्याची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करीत असल्याची भावना सीमेपलीकडील लोकांनी व्यक्त केली, असा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे.

1. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेला लागून असणार्‍या पाकिस्तानच्या कब्जातील व्याप्त काश्मिरातील काही गावांतील लोकांचे मोबाईल घेऊन संबंधित वृत्तवाहिनीने मते आजमावली.

2. काश्मीरमधील लोकांना आता परिस्थितीचे भान आले आहे. कलम 370 हटविल्यामुळे विकास होत असल्याची जाणीव मतदारांना झाल्याची प्रतिक्रिया सीमेपलिकडून व्यक्तकरण्यात आल्या.

3. पीओकेमध्ये विधानसभेच्या 24 जागा आहेत. या ठिकाणी भारत सरकारने ऑनलाईन मतदान घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

4. जम्मू-काश्मीरमध्ये शांततेत मतदान पार पडले आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा झालेली नाही. त्यामुळे पीओकेतील जनमत भारतात सामील होण्याच्या बाजूने वाढत चालले आहे, अशी माहिती पीओकेतील रहिवासी सज्जाद रजा यांनी दिली.

5. पीओकेतील दिरकूकचे सरपंच आकीब राजपूत म्हणाले की, व्याप्त काश्मीरमध्ये महागाईने लोक त्रस्त झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विकास आणि रोजगार निर्माण होत आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकप्रकारे पीओकेच्या भविष्याची आहे.

6. व्याप्त काश्मिरातील लोकांना अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाक सरकारमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उलट जम्मू-काश्मीरमध्ये खर्‍या अर्थाने लोकशाही दिसून येत आहे. त्यामुळे आम्हाला हिंदुस्थानात सामील होण्याची प्रतीक्षा असल्याचेही पीओकेतील काही लोकांनी सांगितले.

2024-10-01T23:42:50Z dg43tfdfdgfd