पॅन, आधार कार्ड देताय... सावधान !

संतोष शिंदे पुढारी प्रतिनिधी

पिंपरी : पॅन कार्ड, आधार कार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे देताय... तर, जरा थांबा..! कारण कागदपत्रांच्या आधारे परस्पर बैंक खाती उघडून सायबर चोरटे गैरव्यवहार करत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत; तसेच चुकीची माहिती किंवा कमिशनचे आमिष दाखवून बँक खात्यांचा सायबर गुन्हेगारांकडून वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर विभागाकडून करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून सायबर चोरट्यांनी मागील आठ महिन्यांत सुमारे सव्वाशे कोटींच्या रकमेवर डल्ला मारल्याची नोंद आहे. दरम्यान, सायबर खात्यांवर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांना काही प्रकरणांमध्ये संबंधित खातेधारकांनी कमिशन आमिषापोटी खातेच किंवा काही रकमेच्या विकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी याबाबत जनजागृती सुरू केली आहे. मनी लॉन्ड्रिंग किंवा बेकायदा व्यवहारांसाठी वापर होणाऱ्या बँक खात्यांना 'खेचर खाते' असे म्हणतात.

अनेक प्रकरणांमध्ये खातेधारकाला आपल्या खात्यावर झालेल्या व्यवहारांची माहिती नसते; तसेच अनेकांना त्यांच्या नावावर असलेल्या खात्यांचा अशा पद्धतीने वापर होईल याची पुसटशी कल्पनादेखील नसते. असे असले तरी संबंधित खातेधारकांवर गुन्हे दाखल केले जातात. संबंधित खाते गोठवून तपास केला जातो. या खेचर खात्यासाठी कामगारांना टार्गेट केले जाते.

फसवणूक टाळण्यासाठी हे करा

• आपल्या वैयक्तिक बँक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका.

• अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी बँक खाते उघडू नका.

• अनोळखी व्यक्ती किंवा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारासाठी, कमिशनसाठी आपल्या बँक खात्यांचा वापर होऊ देऊ नका.

नागरिकांनी आपली महत्त्वाची कागदपत्रे अनोळखी व्यक्तींच्या हातात देऊ नये. सायबर गुन्हेगार 'मनी लॉन्ड्रींग'साठी सर्वसामान्य नागरिकांच्या नावे उघडलेली बँक खाती वापरत आहेत. शासनाच्या वेगवेगळ्या योजना सांगून कागपत्रांची मागणी केली जाते. अशा प्रकारे कोणी कागदपत्रांची मागणी करत असल्यास स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

महाराष्ट्रातही 'खेचर खाती'

आंतरराष्ट्रीय रॅकेटकडून मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रींग केली जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यासाठी खेचर खात्यांचा वापर होतो. काही स्थानिकांना हाताशी धरून अशा Pimpri Chinchwad Police 111 सावधान आवाज सावधान !!!

खातेधारकांचा शोध घेतला जातो. सुरुवातीला पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश त्यानंतर नवी मुंबई परिसरात अशा खेचर खात्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहेत. मागील काही महिन्यांपासून पुणे आणि अहमदनगर तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही खेचर खाती वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

खेचर बँक खाती म्हणजे काय ?

• सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वर्ग किंवा प्राप्त करण्यासाठी सायबर गुन्हेगार जे बँक खाते वापरतात त्यांना खेचर खाते म्हणतात.

• सर्वसामान्यांच्या चालू (करंट) किंवा बचत (सेव्हिंग) खात्याचा वापर फसवणुकीसाठी होतो. खात्यामधील व्यवहाराच्या १ ते २ टक्के कमिशन दिले जाईल, असे सांगितले जाते.

• ऑनलाइन गेमिंगसाठी खाते वापरले जाईल, असे सांगून खाते खरेदी केली जातात.

अशी मिळवतात बँक खाती

सायबर चोरटे हे ई-मेल, व्हॉटस् अॅप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मव्दारे सर्वसामान्यांशी संपर्क साधतात. ऑनलाइन व्हिडिओ गेम किंवा इतर कारणांसाठी बँक खाते सुरू करायचे आहे, त्यासाठी कमिशन दिले जाईल, असे सुरुवातीला सांगितले जाते. त्यानंतर बँक खाते सुरू करून त्याचा चुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापर केला जातो.

या व्यतिरिक्त शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजनांच्या आर्थिक लाभासाठी तुमच्या नावाने नवीन बँक खाते उघडावे लागेल, असे सांगून सर्वसामान्यांना बँक खाते उघडण्यास सांगितले जाते. अशा वेगवेगळ्या प्रकारे गुन्हेगार बँक खाती मिळवत आहेत.

2024-10-02T06:13:01Z dg43tfdfdgfd