गंगापूर पुढारी वृत्तसेवा : ढोरेगाव पोटूळ येथे पेडापूर फाटा येथील रस्त्यावर ट्रॅक्टरच्या टँकरद्वारे पाणी मारत असताना एका कामगाराचा पाय घसरल्याने ट्रॅक्टर अंगावरून जावून दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना बुधवार (दि.२) सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली असून रमेश धनाजी बोबडे (वय.४९ रा, पेंडापूर) मृत मजूराचे नाव आहे. मयत रमेश बोबडे हे गेल्या चार-पाच दिवसापासून त्या रस्त्यावर ट्रॅक्टर द्वारे पाणी मारण्याचे काम करत होते.
छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये मसाला करताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यूयाबाबत अधिक माहिती अशी की, ते पाणी मारुन झाल्यावर चालू ट्रॅक्टरमध्ये बसताना त्यांचा पाय घसरूला. पाय घरसल्याने ते रस्त्यावर पडले, यावेळी त्यांच्या अंगावरून पाण्याच्या टँकर गेल्याने ते जखमी झाले. यानंतर त्यांना कामगारांनी तात्काळ उचलून छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी नेले. यावळे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी एक भाऊ व विवाहीत बहिण असून त्यांच्या अच्यानक जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
2024-10-02T12:54:17Z dg43tfdfdgfd