अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार (Ajit Pawar) यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नोकरी नसलेल्या, शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मुंबई, पुण्यात नोकरी असणाऱ्या मुलांना विवाहासाठी मागणी वाढत आहे. या प्रश्नाविषयी बोलताना आमदार देवेंद्र भुयार यांनी हे वक्तव्य केले आहे. चांगली मुलगी नोकरीवाल्याला, दोन नंबरची दुकानदाराला, तीन नंबरचा गाळ शेतकऱ्याचा गळ्यात, असे वक्तव्य आमदार देवेंद्र भुयारांनी केले आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरें गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) देवेंद्र भुयारांनी हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र भुयार म्हणाले, आज जर लग्नासाठी मुलगी पाहिजे असेल तर मुलाला नोकरीवाला पाहिजे. मुलगी स्मार्ट आणि एक नंबर देखणी असेल तर ती मुलगी तुमच्या माझ्यासारख्या पोट्ट्याला भेटणार नाही. ती नोकरी करणाऱ्या मुलांना मिळते. दोन नंबरची मुलगी कोणाला मिळते, ज्यांचा धंदा आहे, पानटपरी, किराणाचे दुकान आहे अशा मुलांना मिळते. तीन नंबरचा जो राहिलेला गाळ आहे तो हेबडली हाबडली जी पोरगी आहे. ती शेतकऱ्यांच्या मुलांना मिळते.
भुयार पुढे म्हणाले, म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं खरं राहिल नाही आहे. कारण जन्माला येणारे जे लेकरू आहे ते हेबंड वांभडच निघत राहिल. म्हणजे माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वानराचे पिल्लू असा सगळा कार्यक्रम आहे. म्हणून तुम्ही जरा सावध राहा.
देवेंद्र भुयारांच्या या वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, देवेंद्र भुयारचे हे वाह्यात वक्तव्य फक्त महिलांचाच अवमान नाही तर कृषीक्षेत्रामध्ये राबणाऱ्या भूमिपुत्रांची अवहेलना तथा कृषीक्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणारे, शेतकऱ्यांची टिंगल उडवणारे आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांच्याकडून या वाचाळवीरांना अजिबात आवर घातला जात नाही हे दुःखद आहे.
हे ही वाचा :