Trending:


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM: 23 June 2024

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM: 23 June 2024 नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी लातूरचे दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात. एक शिक्षक लातूर झेडपी चे तर दुसरे सोलापूर झेडपीचे आज होणारी नीट पीजी परीक्षा अचानक रद्द. नीट युजीपाठोपाठ नीट पीजीमध्ये घोळ झाल्याची शंका, लवकरच नवी तारीख जाहीर होणार नीटमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1,563 विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा, नीटमधील घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना पेन्शन देणार. जळगावातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची उद्या बैठक, सत्ता परिवर्तनसाठी विधानसभा एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी, जातीय विरोध केला नाही तरी पंकजा मुंडेंना बीडमधून का पाडलं, भुजबळांचा सवाल सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप.. तर आज सकाळी १० वाजता जरांगेंची पत्रकार परिषद शेतीच्या पाणीपट्टीत २० टक्क्यांनी वाढ, विधीमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा...तर पाणीपट्टीची ही वाढ मविआ काळातीलच, फडणवीसांचं स्पष्टीकरण...


आंतरराष्‍ट्रीय : आखातातील असुरक्षित भारतीय

भारतीय मजुरांना मोठमोठी स्वप्ने दाखवून आखाती देशांत नेण्यात येते; पण त्यांना दिलेल्या हमीनुसार वेतन आणि सुविधा दिली जात नाही. आपल्या तुलनेत आखाती देशांत जादा वेतन मिळत असल्याने, तसेच बेरोजगारीमुळे ते घर सोडून चांगले आयुष्य जगण्यासाठी आखाती देशांना प्राधान्य देतात. परंतु, बहुतांशवेळा फसगतच होते. आखाती देशांत कुवेतसह बहारिन, इराक, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब …


Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले...

Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले... पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porshe Accident) आणखी एका भीषण अपघातानं (Pune Nashik Highway Accident) पुणे (Pune News) हादरलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका आमदाराच्या पुतण्यानं आपल्या गाडीनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवल्याचा प्रकार घडला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यानं मद्यप्राशन केलं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालकानं दोघांना चिरडलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या (Dilip Mohite Patil) पुतण्याकडून हा अपघात झाला आहे. या प्रकरणी मोहिते पाटलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या कार चालवताना दारुच्या नशेत होतो, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पैशाचे वाटप

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: नाशिक शिक्षक मतदार संघाच्या महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (दि.२२) जळगावात आले होते. येथील आदित्य लॉन येथे मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली. आधीच सभेला उशीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यावर शिक्षक लोकांनी बाहेर जेवणाकडे जाण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री गेल्यानंतर या सभागृहात पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी …


Breaking News LIVE Updates: अलिबागमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यू

Today Breaking News LIVE Updates: देशाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडींसहीत महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी अगदी मोजक्या आणि संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या...


Intercity Express And Deccan Express: पुणे-मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; इंटरसिटी एक्स्प्रेस व डेक्कन एक्स्प्रेस इतक्या दिवसांसाठी बंद

Pune-Mumbai Railway: पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दोन एक्स्प्रेस गाड्या ३ दिवस बंद राहणार आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.


पनवेलमधील चर्चमध्ये चोरी

पनवेल शहरातील लाईन आळी परिसरातील सेन्ट फ्रान्सीस न्यू चर्चमध्ये तीन दिवसांपूर्वी चोरी झाली.


नक्षल्यांचा प्रमुख नेता गिरीधरचे फडणवीसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीतील राजकीय आणि लष्करी हालचालींचा प्रभारी आणि वरिष्ठ नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू याने शनिवारी (दि.२२) पत्नी संगीता हिच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. १९९६ मध्ये नक्षल चळवळीत भरती झालेल्या गिरीधरने विविध दलममध्ये काम केल्यानंतर विभागीय समिती सदस्य, …


गर्दभ आख्यान…

पूर्वी आपण भारतीय आपल्या मागासपणाच्या मासल्यासाठी अमेरिका युरोपसिंगापूरच्या प्रगल्भतेची उदाहरणे द्यायचो. आता उगी विकासाच्या गमजांसाठी पाकिस्तानच्या बुटक्या अर्थव्यवस्थेला तुलनेसाठी धरतो, हे भारतातही गर्दभजमात जोमाने वाढत असल्याचे लक्षण आहे काय?


Rahul Gandhi Resignation : ..तर राहुल गांधींची दोन्ही जागांवरील निवड होईल रद्द,निर्णय घेण्यासाठी उरले फक्त २४ तास

४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला होता. यामध्ये राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघांतून विजयी झाले होते. ते विजयी झालेल्या रायबरेली आणि वायनाड या दोन महत्वपूर्ण मतदारसंघांपैकी त्यांना निकाल जाहीर झाल्याच्या १४ दिवसांमध्ये एका मतदारसंघांतून राजीनामा देणे बंधनकारक आहे.त्यामूळे राहुल गांधींकडे आपला निर्णय घेण्यासाठी फक्त २४ तास उरले आहेत.


MHT-CET 2024 सदंर्भात आक्षेपावर CET विभागाकडून मोठा खुलासा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून घेण्यात आलेल्या MHT-CET 2024 संदर्भात काही आक्षेप पालक,परिक्षार्थी आणि लोकप्रतिनिधी यांनी घेतले आहेत. याबाबत वस्तुस्थितीदर्शक खुलासा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून करण्यात आलाराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषीशिक्षण याअभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली MHT-CET 2024 ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक 22 एप्रिल, 2024 ते 30 एप्रिल, 2024...


उरणमध्ये राजकीय गणितांची फेरबांधणी

मावळ लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या उरणमध्ये भाजपची मते वाढली असली तरी येथे महाविकास आघाडीची एकत्रित ताकदीचा सामना या पक्षाला करावा लागणार आहे.


हे ‘नाटक’ थांबवा...

एखादे शहर केवळ उड्डाणपूल, मेट्रो किंवा उंचच उंच इमारती यामुळे प्रगतिशील मानले जात नाही. तेथे सामान्य नागरिकांसाठी जीवन समृद्ध करणाऱ्या - ग्रंथालये, बागा, नाट्यगृहे, सार्वजनिक स्वच्छ स्वच्छतागृहे, दिव्यांगांसाठी जागोजागी रॅम्प, कचरापेट्या - आदी सेवासुविधा किती प्रमाणात उपलब्ध आहेत, यावर त्या शहराच्या प्रगतीचा दर्जा अवलंबून असतो. आपले शहर ३०-४० वर्षांपूर्वी प्रगत होते आणि आता त्याची अधोगती होत आहे, असे म्हणावे की काय, अशी परिस्थिती सभोवती आहे....


Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 23 जून 2024

Top 60 Superfast News : महत्वाच्या 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 23 जून 2024 ज्या मुस्लिमांच्या नोंदी सापडल्यात त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या... जरांगेंची नवी मागणी सगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वाशीत उधळलेल्या गुलालाचा विसर नको, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची उद्या बैठक...बैठकीआधी शरद पवारांकडून जागांची चाचपणी ...जिल्हानिहाय अहवाल मागवला आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात, एकाचा मृत्यू, नशेत गाडी चालवल्याचा स्थानिकांचा आरोप, तर दिलीप मोहिते पाटलांकडून इन्कार अमरावतीचं खासदार कार्यालय पुन्हा एकदा सील.खासदार अनिल बोंडेंचाही कार्यालयावर दावा. तर यशोमती ठाकुरांवर गुन्हा दाखल. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. तर सुषमा अंधारेंचे आरोप शिंदेंच्या शिवसेनेने फेटाळले.. नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी लातूरचे दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात. एक शिक्षक लातूर झेडपी चे तर दुसरे सोलापूर झेडपीचे आज होणारी नीट पीजी परीक्षा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अचानक रद्द. , लवकरच नवी तारीख जाहीर होणार नीटमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1,563 विद्यार्थ्यांची आज फेरपरीक्षा, नीटमधील घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे


बालमैफल : जाणीव

अथर्वच्या बाबांनी त्याला सिंगापूरहून आणून दिलेलं पेन प्रसादने जबरदस्तीनेच स्वत:कडे ठेवून घेतलं होतं. मारामारीबद्दल अथर्वने सगळं घरी जाऊन आई-बाबांना सांगितलं. पॅरेन्टस मिटिंगमध्ये मी टीचरशी बोलेन असं अथर्वच्या आईने त्याला समजावलं.


Neet Exam Teacher Arrest : लातूर पेपर फुटीप्रकरणी कोचिंग क्लासेस चालवणारे दोन शिक्षक ताब्यात

Neet Exam Teacher Arrest : लातूर पेपर फुटीप्रकरणी कोचिंग क्लासेस चालवणारे दोन शिक्षक ताब्यात नीट पेपर फुटी प्रकरणी दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात... एक लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत.... दोघे ही जिल्हा परिषद शाळेत आहेत शिक्षक...दोघांची कसून चौकशी सुरू वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावे आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत (नीट) घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का या दृष्टीने तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले.


Devendra Fadnavis Full PC : काळाराम मंदिरात दलितांविरोधात धमकीचं पत्रकं, फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis Full PC : काळाराम मंदिरात दलितांविरोधात धमकीचं पत्रकं, फडणवीस काय म्हणाले? पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे... काळाराम मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीचा पत्र प्रकाशित करण्यात आलं होतं.. ज्याने तो प्रकाशित केलं होतं, त्याला अटक झाली आहे.. त्याने दुसऱ्या एका व्यक्तीशी जुनं वैमनस्य काढण्यासाठी दलित समाजाला धमकी देणारा, निळे झेंडे लावू नका असं मजकूर असलेला पत्रक प्रकाशित केला होता.. ज्याने हे पत्र प्रकाशित केलंय, तोही दलित समाजाचा आहे... काहीतरी वेगळ्याच हेतूने त्याने हे पत्रक काढलं आहे... पोलीस या मागची कारण काय आहेत ते शोधून काढत आहे... ज्याला अटक केली त्याच्याकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप मिळाले आहे... त्यामुळे अन्य कोणी त्याच्या पाठीशी आहेत का?? दंगल घडवण्यासाठी हे पत्रक काढण्यात आले होते का?? याचा शोध पोलीस घेत आहे... सध्या तरी प्राथमिक दृष्ट्या एका व्यक्तीशी जुन्या वैमानस्यातून हे पत्रक काढण्याचे दिसत आहे... मात्र अटक झालेल्या व्यक्तीकडे ज्या वस्तू सापडल्या आहे, त्यामुळे त्याचा हेतू वेगळा होता का याचाही शोध घेतला जात आहे... यापुढे देखील असे प्रयत्न होऊ शकतात... पत्र काढायचं आणि समाज माध्यमावर तो पोस्ट करायचे आणि समाजात गैरसमजुत निर्माण करून दंगल सदृश्य स्थिती निर्माण करायची असं यापुढेही होऊ शकतं.. म्हणून गृह विभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे... पोलीस महासंचालक आणि एसआयडी ला वस्तुस्थिती सांगितली आहे... काही राजकीय नेत्यांनी काल तो पत्र ट्विट केलंय.. माझी त्यांना विनंती आहे, शहानिशा न करता, वस्तूस्थिती न तपासता समाज माध्यमावर पोस्ट केली तर समाजात तेढ निर्माण होईल... कालच्या प्रकरणात सर्व सत्य बाहेर आलाय...


Dharavi Redevelopment : मोठी बातमी : धारावीची जमीन शासनाच्या खात्यांना हस्तांतरित करणार, अदानी समूह केवळ पुनर्विकास करणार

Dharavi Project Adani Redevelop : धारावी झोपडपट्टीचा अदानी ग्रुप केवळ पुनर्विकास करणार असून ती जमीन महाराष्ट्र सरकारच्या विभागांकडे हस्तांतरित होणार आहे. अदानी केवळ विकासक म्हणून काम पाहतील.


Buldhana News : सिंदखेडराजा येथे सापडलेल्या शेषशायी विष्णूच्या मूर्तीचं पूर्ण रूप आलं समोर; इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती असल्याची चर्चा

Buldhana News : बुलढाण्यातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोरच उत्खनन करताना सापडलेल्या शेषशायी विष्णूच्या मूर्तीचं पूर्ण रूप आता समोर आलं आहे.


संविधान बदल आणि इतर खरीखोटी कथानके…

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून १५-२० दिवस झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा रालोआचे सरकार स्थापन झाले आहे.


लोकसभेच्या निकालाने भाजप विधानसभेसाठी सतर्क

नवी दिल्ली : सात टप्प्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला जाहीर झाले आणि पुन्हा एकदा ‘एनडीए’ सरकार सत्तेत आले. असे असले तरी भाजपसह एनडीएला अपेक्षित लक्ष्य गाठता आले नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. तो आकडाही यावेळेस भाजपला मिळवता आला नाही, ‘४०० पार’चे स्वप्न तर दूरच… परंतु या …


अरेच्चा! हा तर सर्वात कुरुप, म्हूणच मिळाला मान; जगातील सर्वात विचित्र कुत्रा

मुंबई : कुत्रे पाळणाऱ्यांची जगात कमी नाही. शिवाय कुत्र्यांच्या ही लाखो प्रजाती आढळतात, लोक आपल्या आवडीप्रमाणे कुत्रा पाळतात आणि त्याला लहान मुलांप्रमाणे प्रेम करतात. काही कुत्रे हे दिसायला खुपस सुंदर असतात. ज्यांना पाहून आनंद होतो. शिवाय ते त्यांच्या निरागसतेने सर्वांचे मन जिंकतात.आज आम्ही तुम्हाला अशा कुत्र्याबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या कुरूप रुपामुळे कुरूप कुत्रा होण्याचा मान मिळवला आहे.आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हा कुत्रा कोण आहे...


Bhandardara Dam: धक्कादायक ! भंडारदरा धरणात बुडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandardara Dam: पावसाळ्यात अनेक पर्यटक भंडारदरा परिसरात फिरण्यासाठी येत असतात. शनिवारी (22 जून) शिर्डी (Shirdi) परिसरातील सहा तरुण फिरण्यासाठी भंडारदरा येथे गेले होते. या तरुणांपैकी एकाचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.


MSRTC Bus Pass: गूड न्यूज! विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा, आता शाळेतच मिळणार एसटीचा पास

MSRTC Bus Students Pass In School: एसटी महामंडळाकडून 18 जूनपासून 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहीमेअंतर्गत विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना शाळेतच बस पास उपलब्ध करून दिला जणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे कष्ट आणि वेळ वाचणार आहे. यासाठी एसटीकडून सर्व शाळा आणि महाविद्यालयांकडून एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थींनींची याद्या मागवण्यात येणार आहेत.


शांतिदूत

Karamat Ali: भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या शांततेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे पाकिस्तानमधील शांततावादी कार्यकर्ते करामत अली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या भारतीय सहृदाने जागवलेल्या आठवणी...


अभिजात मराठी

अभिजात मराठीच्या पुरस्कर्त्यांनी केवळ चळवळीवर लक्ष केंद्रित केले व मराठी भाषा व भाषा याचाच उद्घोष सुरू ठेवला. मात्र मराठी राज्य भाषेचे, स्टेट लँग्वेजचे घटनाकारांना कोणते कार्यक्षेत्र अभिप्रेत आहे, याकडे दुर्लक्ष केले.