MILITANTS OPEN FIRE IN J&K : भारतीय वायूसेनेच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला, पाच जवान जखमी

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात किमान पाच जवान जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सुरनकोट भागातील सनई टॉपकडे वाहने जात असताना सायंकाळी हा हल्ला झाला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हल्ल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सच्या एका तुकडीने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. ज्या वाहनांवर हल्ला झाला, त्यांना शाहसीतारजवळील सामान्य परिसरात हवाई तळाच्या आत सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच

2024-05-04T15:11:25Z dg43tfdfdgfd