LUCKNOW BUILDING COLLAPSE : उत्तर प्रदेशमध्ये तीन मजली इमारत कोसळली; पाच जणांचा मृत्यू, २४ जखमी; २८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश

Lucknow Building Collapse : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एक तीन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून २४ जखमी झाल्याची प्राथमिक आहे. आतापर्यंत २८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलं आहे. तसेच अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अकडले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दखल घेतली असून अधिकाऱ्यांना तातडीने मदतीच्या सुचना दिल्या आहेत.

आतापर्यंत २८ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

हरमिलाप टॉवर असं या इमारतीचे नाव असून ही जीर्ण अवस्थेत होती, अशी माहिती पुढे आली आहे. अशातच शनिवारी सायंकाळी ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान पथकाचे कर्मचारी आणि अधिकारी तसेच पोलीस दल घटनास्थळी दाखले झाले. सद्या इमारतीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २८ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून अनेक जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Woman Molested In Ambulance : रुग्णवाहिकेत महिलेचा विनयभंग, कर्मचाऱ्याने पीडितेच्या पतीचा ऑक्सिजन काढून घेतला अन्…

२४ जण गंभीर जखमी

या दुर्घटनेत २४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही इमारत कोसळल्यानंतर बाजुला उभा असेला ट्रकही ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना तातडीने मदतीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात बोलताना आम्ही आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले असून २८ जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे, अशी माहिती लखनौचे पोलीस आयुक्त रोशन जॅकोब यांनी दिली.

हेही वाचा – Uttar Pradesh : सेल्फीच्या मोहापायी सरकारी अधिकारी गंगेत वाहून गेला; वाचवण्यासाठी डायव्हर्सनी केली १० हजारांची मागणी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही व्यक्त केलं दु:ख

दरम्यान, या घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. लखनौमधील इमारत कोसळल्याची घटना दुर्देवी आहे. या घटनेची माहिती मिळताच, अधिकाऱ्यांना मदतीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सद्यस्थिती बचावकार्य सुरू असून आम्ही स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

2024-09-07T17:29:59Z dg43tfdfdgfd