LOK SABHA ELECTION 2024 LIVE : राज ठाकरे राणेंच्या प्रचारात व्यग्र, मुंबईत माजी मनसे सरचिटणीसाचा ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Breaking News Live 2024 : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत. उद्या (७ मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून या मतदारसंघांमध्ये काल (रविवार, ५ मे) सायंकाळपासून आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, अजूनही चार टप्प्यांमधील मतदान बाकी असल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी या उर्वरित मतदारसंघांकडे लक्ष वळवलं आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जलना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये येत्या १४ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी या मतदारसंघांकडे मोर्चा वळवला आहे. आजपासून या मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार सुरू झाला आहे. या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे आपलं या मतदारसंघांसह राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांवर लक्ष असेल.

2024-05-06T05:32:31Z dg43tfdfdgfd