CUSTOMS SEIZES RS 42 LAKH GOLD: गुप्तांगामध्ये लपवून आणलं 42 लाखांचं सोनं; एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी अडवलं अन्...

Customs Seizes Rs 42 lakh Gold: तेलंगणमधील (Telangana) हैदराबाद विमानतळावर (Hyderabad Airport) तस्करीच्या माध्यमातून देशात आणलेलं 42 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. शुक्रवारी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मस्कतवरुन हैदराबादमध्ये दाखल झालेल्या एका व्यक्तीने आपल्या गुप्तांगामध्ये सोन्याची ही पेस्ट लपवली होती. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला थांबवून चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

42 लाखांहून अधिक किंमत

कस्टम एअर इंटेलिजन्सच्या टीमने हैदराबादमधील राजीव गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर (Rajiv Gandhi International Airport) ही कारवाई केली. मस्कतमधून एक व्यक्ती सोन्याची तस्करी करणार असल्याची पक्की माहिती मिळाली होती. त्यानुसार आज म्हणजेच शुक्रवारी पहाटे कारवाई करण्यात आली असता ही माहिती खरी निघाली. या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या सोन्याचं वजन 685.7 ग्रॅम इतकं आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 42 लाख 78 हजार 768 रुपये इतकी आहे. 

अधिकारी काय म्हणाले?

"मिळालेल्या माहितीनुसार मस्तकवरुन आलेल्या एका भारतीय पुरुष प्रवाशाला हैदराबाद कस्टम विभागातील एअर इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडवलं. या व्यक्तीने आपल्या गुदद्वारेत सोन्याची पेस्ट असलेल्या दोन छोट्या आकाराच्या ट्यूब लपवल्याचं चौकशीत उघड झालं. या सोन्याचं वजन 685.7 ग्रॅम आहे. याची एकूण किंमत 42 लाख 78 हजार 768 रुपये आहे," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. कस्टमने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये या व्यक्तीने ज्या ट्यूबमध्ये ही पेस्ट लपवून आणलेली ती उघडताना दाखवण्यात आलं आहे. 

मंगळवारी सापडलेलं 1 कोटींचं सोनं

काही दिवसांपूर्वीच 1800 ग्रॅम वजनाचं 1 कोटी रुपये किंमत असलेलं सोनं हैदराबाद विमानतळावर 3 प्रवाशांकडून जप्त करण्यात आलं होतं. ही कारवाई सुद्धा एअर इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी केली होती. मंगळवारी झालेल्या कारवाईमध्ये सौदी अरेबियातून आलेल्या 3 प्रवाशांना ताब्यात घेण्यात आलं. या प्रवाशांनी सोन्याची पेस्ट करुन ती शूजमध्ये लपवून आणली होती.

सौदीमधील व्यक्तीकडून 21 लाखांचं सोनं जप्त

16 मे रोजी सौदी अरेबियामधीलच जेहाद शहरातून आलेल्या एका प्रवाशाकडे 403 ग्राम सोनं सापडलं होतं. या सोन्याची किंमतही 21 लाखांहून अधिक होती. "मिळालेल्या माहितीनुसार जेहादमधून इंडिगोच्या 6 ई- 068 विमानामधून आलेल्या व्यक्तीची एअर इंडेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्याच्याकडे हे सोनं सापडलं," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

2023-05-26T05:30:32Z dg43tfdfdgfd