CABINET DECISIONS: केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘चांद्रयान-४’ मोहिमेला मंजुरी

Cabinet Decisions: केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याचवेळी चांद्रयान मोहिमेबाबतही केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळाने आता ‘चांद्रयान-४’ या मोहिमेला बुधवारी मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे. चांद्रयान-४’ मोहिमेचा विस्तार करण्यात येणार असून चंद्रावर मानवी मोहीम पाठवणे हे त्याचे पुढचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयांबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, “चांद्रयान-४ मोहिमेचा विस्तार आणखी घटक जोडण्यासाठी करण्यात आला आहे. चंद्रावर मानवयुक्त मोहिमेची पुढील पायरी असेल. या दिशेने सर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर ‘चांद्रयान-४’ या मोहिमेला मान्यता देण्यात आली आहे. व्हीनस ऑर्बिटर मिशन, गगनयान फॉलो-ऑन आणि भारतीय अंतरीक्ष स्टेशन आणि नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल डेव्हलपमेंटलाही मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे.

2024-09-18T12:04:28Z dg43tfdfdgfd