डिंडीगुल: श्रीमंत भाविक मंदिरांना लाखो पैसे किंवा सोने दान करताना आपण पाहिलंच असेल. पण, केरळच्या एका सामान्य घरातील महिलेची मौल्यवान सोन्याची साखळी पलानी मुरुगन मंदिरात नकळतपणे दानपेटीत पडली. मात्र, मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अंध्यक्षांनी तिला समान मूल्याची नवीन सोन्याची साखळी भेट म्हणून दिली.
पलानी येथील अरुल्मिगु धनदायुथापानी स्वामी मंदिरात तामिळनाडू आणि इतर राज्यांमधून दररोज शेकडो भाविक दर्शनाला येत असतात. केरळमधील अलप्पुझा येथील एस संगीता या देखील मंदिरात दर्शनाला आल्या होत्या. दर्शन झाल्यानंतर बाहेर पडताना त्यांना एक दानकुंड दिसलं.
दानपेटीत अर्पण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या गळ्यातील तुळशीची माळ काढण्याचा प्रयत्न केला. पण, नकळत, त्यांची सोन्याची साखळीही निघाली आणि ती दानपेटीत पडली. हे लक्षात येताच त्या घाबरल्या आणि त्यांनी थेट मंदिराच्या विश्वस्तांकडे धाव घेतली. साखळी परत मिळवण्यासाठी काही मार्ग काढण्याचे आवाहन त्यांनी केलं. या महिलेच्या घरची परिस्थिती जेमतें, आधीच आर्थिक संकटांना तोंड देत असताना या घटनेने त्यांना धक्का बसला.
दानपेटी नियम, १९७५ ची स्थापना, सुरक्षितता आणि लेखानुसार, पेटीत दान केलेलं कोणतीही वस्तू कधीही मालकाला परत केली जाऊ शकत नाही, कारण ती मंदिराची असते.
महिलेच्या माहितीनुसार, सीसीटीव्ही कॅमेर्याचे व्हिडिओ फुटेज तपासून त्यांनी केलेल्या दाव्याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर काय करावे यावर मंदिर विश्वस्त विचार करु लागले. मंदिराचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष के चंद्रमोहन यांनी महिलेची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी स्वतः सोन्याची साखळी विकत घेतली आणि तिला सुपूर्द केली.
2023-05-26T07:52:32Z dg43tfdfdgfd