सेल्फी घेताना मोबाइल पाण्यात पडला, अन्न निरीक्षकाने जलाशय रिकामं केलं, उत्तर ऐकून खवळाल

कांकेर, छत्तीसगड : काही माणसे आपल्या वस्तूला जीवापेक्षा जास्त जपतात. वस्तूंना काही इजा पोहोचली किंवा हरवली तर त्यांना खुप दु:ख होते. दरम्यान कांकेरमधील एका घटनेत एका व्यक्तीने त्याची हरवलेली वस्तू परत मिळवण्यासाठी जे काही केले आहे, ते पाहून सर्वच चक्रावले आहेत. एका अधिकाऱ्याचा मोबाइल जलाशयात पडला. हा मोबाइल बाहेर काढण्यासाठी त्याने पूर्ण जलाशयातील पाणी बाहेर सोडले. या कृतीवर तीव्र टीका होत आहे.

नेमकं काय घडलं ?

कांकेर जिल्ह्यातील पखंजूरमध्ये एका जलाशयातील कचरा वेअरमधून सलग ३ दिवस पाणी काढण्यात येत होते. ३० अश्वशक्तीचे पंप ३ दिवस रात्रंदिवस सुरू होते. तलावातून पाणी वाहत होते. सुट्टीसाठी आलेल्या अन्न अधिकाऱ्याचा मोबाइल इथे पाण्यात पडला. हा मोबाइल सुमारे ९६ हजार रुपयांचा होता. लाखो लिटर पाणी वाया गेल्यानंतर अधिकाऱ्याचा मोबाइल सापडला. मात्र यामुळे इतके पाणी वाहून गेले की दीड हजार एकर जमीन सिंचनाखाली आली असती. या प्रक्रियेसाठी अधिकाऱ्याने पाटबंधारे विभागाच्या एसडीओची तोंडी परवानगी घेतल्याचा युक्तिवाद त्याने केला आहे. हे प्रकरण कळताच या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली आहे. त्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. आजतकने या प्रकरणी वृत्त दिले आहे.

माझ्याकडे आयफोन नसून SAMSUNG S23 होता. ज्याची किंमत सुमारे ९५,००० रुपये आहे. प्रत्येकाकडे वैयक्तिक मोबाइल आहे. मोबाइल हरवला तर तो शोधण्याचा प्रयत्न सगळेच करतात. माझा मोबाइलही टाकीच्या साठलेल्या सांडपाण्यात पडला. तो पाण्याखाली १० फूट खाली पोहोचला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. गावकऱ्यांनी मोबाइ काढून देण्याचा प्रयत्ना केला. रविवारी आणि सोमवारी त्याने पाण्यात डुबकी मारून मोबाइल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र खाली काचेचे तुकडे आणि धूळ यामुळे मोबाइल हाती लागला नाही. त्यानंतर जलाशय २-३ फूट रिकामा करण्याचा सल्ला काहिंनी दिला. नंतर मी पाटबंधारे विभागाच्या एसडीओशी बोललो. हे निरुपयोगी पाणी असल्याचे सांगितले. जलाशयातील २-३ फूट पाणी कमी करू शकतो का? यावर एसडीओंनी तोंडी परवानगी दिली, असे त्याने सांगितले.

तोंडी परवानगी कशी दिली जाऊ शकते अशी विचारणा केली? असता त्याने सांगितले की, जलाशयातील पाणी काढायचे असेल तर त्याची लेखी परवानगी घ्यावी लागते. मात्र जेथे लोक आंघोळीला जातात तिथे पाणी वाया घालवणे योग्य नाही. हे पाणी फेकून देणे किंवा शेतकऱ्याला देणे शक्य नसल्याने साठवण टाकीतून थोडे थोडे पाणी काढण्याची तोंडी परवानगी देण्यात आली.

फोन पाण्यात पडल्याने त्याचे नुकसान होणारच होते, तरीही तुम्ही असे का केले ? असे अधिकाऱ्याला विचारण्यात आले. मी खूप कमी प्रयत्न केले. माझ्या गावातील बहुतेक ओळखीचे लोक मोबाइल शोधण्यात गुंतले होते. आम्ही दोन दिवस मोबाइल शोधला. आता २-३ फूट पाणी कमी झाले तर मोबाइल शोधणे सोपे जाईल, असे त्यांनी सांगितले. म्हणूनच मी डिझेल पंप लावला. जलाशयाच्या टाकीखाली सिमेंट प्लास्टर असल्याने गाळ साचलेला होता. त्यात काचेचे तुकडे वगैरे पडलेले होते. या कारणामुळे मोबाइल काढता आला नाही. पण मोबाइल मिळण्याची शक्यताही ९९ टक्के होती, म्हणून मी मोबाइल शोधण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला, असे अधिकाऱ्याने म्हटले.

कारवाई झाली तर तुम्ही स्वतःला कसे वाचवाल ? असे अधिकाऱ्याला विचारले. बातम्यांमध्ये येईन एवढी मोठी चूक मी केलेली नाही. मोबाइल घेण्यासाठी मी एक लाख रुपये खर्च केल्याचे बोलले जात आहे. मात्र या संपूर्ण शोधात केवळ ७००० ते ८०० रुपये खर्च आला आहे. यात मी स्थानिक लोकांकडून पाइप मागवले. हे पाणी वाहून जाण्याऐवजी मी कालव्यात टाकले. यात मी पदाचा गैरवापर केलेला नाही. तसेच मी गरीब कुटुंबातील नाही. माझ्या घरातील सर्वजण नोकरदार आहेत. मला पैशाची काही अडचण नाही, असे उत्तर अधिकाऱ्याने दिले. पण त्यानंतर प्रशासाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली.

2023-05-26T16:37:40Z dg43tfdfdgfd