NHPC VACANCY 2024 : एनएचपीसीमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे; अर्ज करायला उरलाय फक्त १ आठवडा

NHPC Recruitment 2024 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूच जाहीर करण्यात आली आहे, जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुम्ही एनएचपीसीमध्ये अर्ज करू शकता. NHPC मध्ये विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत, NHPC मध्ये शिकाऊ पदाच्या म्हणजेच Apprenticeship च्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही ITI, डिप्लोमा पास किंवा पदवीधर असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. NHPC (नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड) च्या nhpcindia.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) मध्ये शिकाऊ पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होऊन बराच कालावधी झाला असून, आता अर्ज करण्यासाठी शेवटचा १ आठवडा शिल्लक आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्यास इच्छूक आणि पात्र उमदेवार ३० एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना सूचित करण्यात येते की, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा.

पदभरतीचा आणि रिक्त पदांचा तपशील :

NHPC च्या या भरतीद्वारे एकूण ५७ रिक्त जागांवर नियुक्त्या केल्या जातील. यामध्ये फिटर पदाच्या २ जागा, इलेक्ट्रिशियन पदाच्या १३ जागा, ड्राफ्ट्समन (सिव्हिल) २ जागा, सर्वेयर आणि प्लंबरची प्रत्येकी २ जागा आणि कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग हेल्पर (कोपा) १८ जगणंचा समावेश आहे.

डिप्लोमा अप्रेंटिसशिप

सिव्हिल - ५ जागा

इलेक्ट्रिकल - ४ जागा

GNM (जनरल नर्सिंग आणि मिडवाइफ) - ४ जागा

ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप

नर्सिंग - २ जागा

हॉटेल मॅनेजमेंट - १ जागा

फार्मासिस्ट ग्रॅज्युएट - २ जागा

पदभरतीच्या अर्ज शुल्काविषयी :

NHPC शिकाऊ भरती २०२४ साठी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

भरती अधिसूचना आणि अर्ज करण्याची लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

NHPC अप्रेंटिसशिप भरती अर्जासाठी आवश्यक पात्रता :

या रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातील संबंधित ट्रेडमध्ये ITI पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. डिप्लोमा धारक आणि अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवीधर देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

आवश्यक वयोमर्यादा :

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे असली पाहिजे, तर कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-23T11:45:26Z dg43tfdfdgfd