ICSE RESULT 2024 : आयसीएसई बोर्डाचा १० वी आणि १२ वी चा निकाल आज; ११ वाजता जाहीर होणार निकाल

ISCE Result 2024 Link LIVE : सीआयएससीई बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि १२ वीचा निकाल आज results.cisce.org, cisce.org वर जाहीर केला जात आहे. Council for the Indian School Certificate Examinations (ICSE) आज, ६ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार आहे. अधिकृत सूचनेनुसार, निकाल पत्रकार परिषदेद्वारे घोषित केला जाईल. उत्तीर्णतेची टक्केवारी, टॉपर्स आणि इतर तपशीलांसह निकालाची आकडेवारी CISCE चे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून जाहीर करतील.

शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ ला आयसीएसई बोर्डाची (ICSE Result 2024) परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइट्स results.cisce.org, cisce.org वरून निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतील. ICSE बोर्डाचा निकाल डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा अभ्यासक्रम, युआयडी आणि इंडेक्स नंबर (Course, UID and Index number) चा वापर करावा लागेल.

Indian Certificate of Secondary Education (भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र) म्हणजेच ICSE बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २८ मार्च २०२४ पर्यंत आणि इयत्ता बारावीची परीक्षा १२ फेब्रुवारी २०२४ ते ०३ एप्रिल २०२४ पर्यंत या कालावधीत आयोजित कार्यात आल्या होत्या. यंदा सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी ICSE Board ची परीक्षा दिली होती.

ICSE निकाल 2024 मार्कशीट लिंक (ICSE Result 2024 Marksheet Link)

icse result 2024 कसे डाउनलोड कराल :

  • सर्वप्रथम, अधिकृत वेबसाइटला भेट द्या – cisce.org किंवा results.cisce.org
  • मुख्यपृष्ठावर, 'icse result 2024' लिंक किंवा 'ISC निकाल 2024' लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा इंडेक्स नंबर आणि UID टाका.
  • निकाल वेबसाईटवर दिसेल.
  • निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी निकालाची प्रत तुमच्याकडे ठेवा.

ICSE चा निकाल लागल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट आणि त्यांच्या डिजीलॉकर खात्यावरून निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात असतील. ICSE निकाल 2024 लिंक, टॉपर्स, पत्रकार परिषद आणि इतर तपशील येथे पहा.

CISCE निकाल DigiLocker वर कसे तपासाला :

  • तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून digilocker.gov.in वर तुमच्या खात्यात लॉग इन करा
  • खात्यात प्रवेश करा आणि 'ICSE १० वी निकाल 2024 लिंक' किंवा 'ISCE १२ वी निकाल 2024 लिंक' वर क्लिक करा.
  • DigiLocker कागदपत्रे मिळविण्यासाठी ICSE रोल नंबर आणि आधार क्रमांकाची विनंती करेल.
  • तुमचे पास सर्टिफिकेट आणि मार्कशीट डिजिटल स्वाक्षरीने मिळवा

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-06T05:04:05Z dg43tfdfdgfd