ICAR IARI RECRUITMENT 2024 : भारतीय कृषी संशोधन संस्थेत नोकरीची उत्तम संधी, या पदांसाठी करता येणार अर्ज

ICAR IARI Recruitment 2024 : भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR : Indian Council of Agricultural Research) मध्ये रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ICAR IARI ने रिसर्च असोसिएट (RA), सीनियर रिसर्च फेलो (SRF) आणि यंग प्रोफेशनल II (YP) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तुमच्याकडे या पदांशी संबंधित पात्रता असल्यास सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी असू शकते. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट iari.res.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

ICAR IARI मध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १२ मे २०२४ पर्यंत वेळ आहे.

या पदांवर भरती केली जाणार आहे :

ICAR IARI या भरतीद्वारे एकूण १५ पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये रिसर्च असोसिएट (RA) च्या ४ पदे, सिनियर रिसर्च फेलो (SRF) च्या ६ पदे, यंग प्रोफेशनल II IT चे १ पद आणि यंग प्रोफेशनल II (YP) च्या ४ पदांचा समावेश आहे.

अर्जासाठी आवश्यक पात्रता :

  • रिसर्च असोसिएट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे.
  • वरिष्ठ संशोधन फेलोसाठी अर्जदारांनी कोणत्याही विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी.
  • कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक यंग प्रोफेशनल II साठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा :

o संशोधन सहयोगी : ४० ते ४५ वर्षे

o वरिष्ठ संशोधन फेलो : ३५ ते ४० वर्षे

o यंग प्रोफेशनल II : २१ ते २५ वर्षे

मिळणार एवढा पगार :

  • रिसर्च असोसिएट पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ५४,००० रुपये पगार मिळेल
  • वरिष्ठ संशोधन फेलोसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ३५,००० रुपये दिले जातील.
  • यंग प्रोफेशनल II साठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रुपये ४२,००० रुपये पगार मिळेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-29T07:52:22Z dg43tfdfdgfd