ESIC RECRUITMENT 2024 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ईएसआयसी अंतर्गत या जॉबकरता निवड झाल्यास मिळणार लाखोंच्या घरात पगार

ESIC Recruitment 2024 : तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालया अंतर्गत असणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने या वर्षीच्या म्हणजेच २०२४ मधील भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ESIC च्या भरती मंडळाने पूर्णवेळ विशेषज्ञ (Full Time Specialist) आणि अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) च्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक उमेदवार esic.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

ESIC च्या फुल टाइम स्पेशलिस्ट (FTS) आणि पार्ट टाइम स्पेशलिस्ट (PTS) या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडे ३० एप्रिल २०२४ पर्यंत वेळ आहे. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरणे अनिवार्य आहे.

हि पात्रता असणे आवश्यक :

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून PG सह MBBS पदवी किंवा समकक्ष पात्रता असावी.
  • अर्जदाराने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया किंवा कोणत्याही स्टेट मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
  • पीजी पदवीधारक उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.
  • पीजी डिप्लोमा पदवी असलेल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित स्पेशलायझेशनमध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.
आवश्यक वयोमर्यादा :

जाहीर करण्यात आलेल्या भरती अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६९ वर्षांपेक्षा कमी असावे.

अशी पार पडणार निवड प्रक्रिया :

भरती सूचनेनुसार, उमेदवारांची निवड वॉक-इन मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अर्जदारांना सर्व वैध कागदपत्रे आणि कार्यानुभव प्रमाणपत्रासह मुलाखत फेरीत सहभागी व्हावे लागेल.

मुलाखतीविषयी सविस्तर :

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालया अंतर्गत असणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने जाहीर केलेल्या पूर्णवेळ विशेषज्ञ (Full Time Specialist) आणि पार्ट टाइम स्पेशलिस्ट (PTS) पदासाठीच्या मुलाखतीसाठी उमदेवराना वैद्यकीय अधीक्षक कक्ष, ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल बेलटोला, गुवाहाटी - ७८१००२ या पत्त्यावर सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे लागले.

निवड झाल्यास मिळणार एवढा पगार :

ESIC भरती २०२४ च्या भरती अधिसूचनेनुसार, या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना आकर्षक पगार दिला जाईल.

पूर्णवेळ तज्ञांना दरमहा १ लाख ६ हजार रुपये.

अर्धवेळ तज्ञांना दरमहा ६०,००० रुपये रुपये.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-26T07:55:26Z dg43tfdfdgfd