CULTURE MINISTRY VACANCY : सांस्कृतिक मंत्रालयामध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Culture Ministry Jobs 2024 : नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. सांस्कृतिक मंत्रालयात विविध पदांच्या रिक्त जागांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. येथे केंद्रीय सचिवालय ग्रंथालयांतर्गत ग्रंथालय व माहिती सहाय्यकाची पदे रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट, indiaculture.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज :

उमेदवार सांस्कृतिक मंत्रालयाच्या या रिक्त पदासाठी ३० मे पर्यंत अर्ज करू शकतात.

रिक्त पदांचा तपशील :

या भरतीद्वारे, सांस्कृतिक मंत्रालयामध्ये ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक या एकूण ११ पदांची नियुक्ती केली जाईल.

अर्जासाठी आवश्यक पात्रता :

  • लायब्ररी आणि माहिती सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संगणक अनुप्रयोगामध्ये डिप्लोमा केलेला असावा.
  • यासोबतच संबंधित कामाचा अनुभवही असायला हवा.

वयोमर्यादा :

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी या वयावरील तरुण अर्ज करू शकत नाहीत.

मिळणार एवढा पगार :

लायब्ररी आणि माहिती सहाय्यक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४०० रुपये पगार दिला जाईल.

सांस्कृतिक मंत्रालयाच्या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सांस्कृतिक मंत्रालयाच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

या पत्त्यावर पाठवा अर्ज :

इच्छुक आणि पात्र उमेदवार या पत्त्यावर सांस्कृतिक मंत्रालयाकडे अर्ज पाठवू शकतात.

पत्ता: संस्कृती मंत्रालय, सचिव ५०२-सी विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली-११०००१

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-06T11:05:06Z dg43tfdfdgfd