पाकचे विमान मलेशियाकडून जप्त

इस्लामाबाद ः वृत्तसंस्था पाकिस्तानची सरकारी नागरी उड्डान कंपनी पाकिस्तान एअरलाईन्सचे (पीआयए) बोईंग-777 विमान मलेशियन सरकारने जप्त केल्याने पाकिस्तानवर नामुष्की ओढावली आहे. विमान सील करण्याचा आदेश क्वालालंपूर भ्रष्टाचार विरोधी कोर्टाने दिला होता. पीआयने हे विमान भाडेतत्त्वावर घेतले होते; मात्र संबंधित कंपनीचे 16 महिन्यांपासून पैसे जमा केले नव्हते. 2020 मध्ये अशाच प्रकारे पीआयएचे विमान जप्त केले होते.

पीआयएचे प्रवक्ते अब्दुल्लाह हाफिज यांनी विमान जप्त केल्याची कबुली दिली आहे. ते म्हणाले, ही घटना मंगळवारी घडली असून विमानात 100 पेक्षा अधिक प्रवाशी होते. प्रवाशांना परत आणण्यासाठी दुसरे विमान पाठवले आहे. याप्रकरणी काही गैरसमज झाले असून आम्ही विमानाचे भाडे देण्यासाठी संबंधित कंपनीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत; मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. कायदेतज्ज्ञांचे एक पथक क्वालालंपूरला पाठवले जात असून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली लागेल.

युरोपियन युनियननेही बंदी घातली होती

2020 मध्ये युरोपिय युनियनमधील 28 देशांनी पाकिस्तानच्या सर्वच एअरलाईन्सवर बंदी घातली होती. पाकिस्तानचे बहुतांश वैमानिकांकडे बनावट लायसेन्स आणि पदव्या असल्यावे आम्ही कशी रिस्क घेणार असल्याचे पाकिस्तानचे विमान उड्डाण मंत्री यांनी संसदेत सांगितले होते, असे युरोपियन युनियनने सांगितले होते. याप्रकरणी पाकिस्तान सरकारने खेद व्यक्त केला होता.

The post पाकचे विमान मलेशियाकडून जप्त appeared first on पुढारी.

2023-06-01T04:18:27Z dg43tfdfdgfd