SSC RESULT 2023 LIVE UPDATES: उरले काही तास, दहावीचा निकाल कुठे पाहायचा?

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. अखेर उद्या शुक्रवार म्हणजेच 02 जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (maharashtra ssc result 2023) होणार आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता निकाल हा बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर होईल.

2023-06-01T14:54:16Z dg43tfdfdgfd