Solo Tracking Ban In Nepal : माउंट एव्हरेस्टवर सोलो ट्रेकिंगवर बंदी घातल्यानंतर आता भारताशेजारील सुंदर देश अशी ओळख असलेल्या नेपाळ सरकारनं देशभरात सोलो ट्रेकिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळमधील अनेक शिखरं सर करण्यासाठी भारतासह जगभरातील पर्यटक गर्दी करत असतात. सोलो ट्रेकिंग करताना अनेकदा पर्यटकांचा मृत्यू झाल्यामुळं त्यांना शोधणं कठीण जात असल्यामुळं नेपाळ टुरिस्ट बोर्डानं सोलो ट्रेकिंग करण्यावर बंदी घालत एप्रिल महिन्यापासून नवे नियम लागू केले जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं आता नेपाळ सरकारच्या या निर्णयामुळं याचा परिणाम असंख्य पर्यटकांवर होणार आहे.
माउंट एव्हरेस्टसह जगातील आठ उंच पर्वतं हे एकट्या नेपाळ या देशात आहेत. या शिखरांना सर करण्यासाठी अनेक पर्यटक एकट्यानं ट्रेकिंग करतात. एकट्यानं प्रवास करणाऱ्या पर्यटकांचा शिखरावरून पडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या होत्या. त्यानंतर मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना शोधणं कठीण जात असल्याचं नेटीबीनं म्हटलं आहे. त्यामुळं आता पर्यटकांना नेपाळमधील शिखरं सर करायची असतील तर त्यांना एकट्यानं जाता येणार नाहीये. बेपत्ता झालेल्या पर्यटकांना शोधण्यासाठी आतापर्यंत नेपाळ सरकारनं मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला होता.
गोपीनाथ मुंडेंमुळंच महाराष्ट्रात भाजपचा विस्तार झाला; मित्राच्या आठवणीत नितीन गडकरी भावूक
सोलो ट्रेकिंग करणारे पर्यटक एकटे असतील तर शिखरावर त्यांना मदत करणारं कुणीही नसतं. त्यामुळं सोलो ट्रेकिंग करणारे पर्यटक जेव्हा बेपत्ता होतात, तर त्यांना शोधणं शक्य होत नसल्यामुळं आम्ही त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं नेपाळ टुरिझम बोर्डाचे प्रभारी मणिआर लामिछाने यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी TIMS कार्ड अनिवार्य करण्यात येणार असल्याचंही लामिछाने यांनी म्हटलं आहे.
Farmer Long March : शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर किसान सभेची माघार
2023-03-18T17:43:31Z dg43tfdfdgfd