सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्ग हा रेडी बंदराला जोडला जायला हवा. या महामार्गामुळे कोणत्याही प्रकारे वृक्ष वनसंपदा नष्ट होणार नाही, कारण हा महामार्ग गेळे येथून टनेल मधून जाणार आहे. आंबोली पर्यायी रस्त्याच्या मार्गातून मळगाव खालून महामार्ग जाणार असून या महामार्गाचे फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत यासाठी आपण लवकरच त्यांची भेट घेणार आहे, अशी माहिती आ. दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर निवती येथील देशातील सर्वात मोठया अंडरग्राउंड म्युझियमचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंगळवार 10 जून रोजी दुपारी 12 वा. दृकश्राव्य माध्यमाने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या युद्धनौकेवर निवती बेटाजवळ हे म्युझियम सुरू होणार आहे. यासाठी केंद्र शासनाने 50 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला दिला आहे. यासाठी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई व पालकमंत्री नीतेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे आ. केसरकर यांनी सांगितले. अभिनंदन केले आहे. हे अंडरवॉटर म्युझियम स्कुबा डायव्हिंग व पानबुडीच्या मदतीने प्रत्यक्ष पाहता येणार आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस उपस्थित होते. किनारपट्टीवरील वेंगुर्ले, मालवण, देवगड शहरांना अंडरग्राउंड वीज केबल कनेक्शन देण्याबरोबर सावंतवाडी ते इन्सुली अंडरग्राउंड कनेक्शन तसेच इन्सुली ते सासोली आणि वेंगुर्ले ते मळेवाड अशा प्रकारे अंडरग्राउंड वीज केबल टाकण्याचे काम सुरू आहे. सावंतवाडी व कणकवली तालुके अंडरग्राउंड वीज केबल पासून वंचित राहिले असून वैभववाडी तालुक्यातील वीज वाहिन्या अंडरग्राउंड करण्यासाठी आपण महावितरणच्या मुख्य अभियत्यांशी चर्चा केल्याचे आ. केसरकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री तथा वीज मंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही याबाबत लक्ष वेधार असल्याचे ते म्हणाले.
सावंतवाडी मोती तलावातील म्युझिक फाउंटन साठी चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा संगीत कारंजा चालविण्याची आणि देखभाल दुरुस्तीची पुढील पाच वर्षांची जबाबदारी ठेकेदाराची आहे. सध्या हा कारंजा ट्रायल बेसवर सुरू असून लवकरच याचे उद्घाटन केले जाणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी दोन डॉक्टर्स दिले असून फिजिशियन देण्याबाबत आपण आरोग्य मंत्र्यांची भेट घेणार आहे. हत्ती हटाव मोहिमे बाबत बोलताना त्यांनी कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली.
भारतीय जनता पार्टी हा आपला मित्र पक्ष आहे. ते आपले काम करत आहेत. आम्हाला त्याचा आनंद आहे. यामुळे मतदारसंघात शिवसेनेत प्रवेश घेताना भारतीय जनता पार्टीतून आलेल्या कार्यकर्त्याला शिवसेनेत घ्यायचे नाही,असे आम्ही ठरवले आहे. कारण यामुळे गैरसमज निर्माण होतात. असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
2025-06-10T01:16:31Z