SATARA NEWS | केवळ 29 टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या

सातारा : सातारा जिल्ह्यात खरीप हंगामाचे 3 लाख 96 हजार 392 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी प्रत्यक्ष 1 लाख 13 हजार 347 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून त्यांचे प्रमाण 28.59 टक्के आहे. सततच्या पावसामुळे शेतीला वाफसा येत नसल्याने पेरणीपूर्व मशागतीसह पेरणीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पेरणीपूर्व मशागतीच्या वेळेतच पावसाने सुरुवात केली आहे. ठिकठिकाणच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतीला वाफसा न आल्याने मशागतीसह पेरणीची कामे रखडली आहेत. शेतकर्‍यांनी बँका, पतसंस्था, सोसायट्यांच्या माध्यमातून बि-बियाणे खरेदीसाठी कर्ज घेतले. मात्र खरेदी केलेले बियाणे पाऊस असल्याने पेरता येईना. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

2025-07-06T00:37:56Z