SAMBHAJI NAGAR NEWS : होय, महिलाही पुरुषावर अत्याचार करतात

Sambhaji Nagar Women also abuse men

भाग्यश्री जगताप

छत्रपती संभाजीनगर होय, महिलांप्रमाणे पुरुषांवरही त्यांच्या पत्नीकडून अत्याचार होतात, हे न पटणारे असले तरी ते सत्य आहे. सध्या हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे हुंडाबळी ठरलेल्या अनेक पीडितांच्या घटना समोर येत आहेत. मात्र केवळ पतीच किया त्याचे कुटुंबीयच पत्नीवर अत्याचार करतात असे नाही, तर पत्नीही आपल्या पतीवर अत्याचार करते, अशा जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ४८ तक्रारी दाखल झालेल्या आहेत.

Sambhaji Nagar News : विरोधी पक्षनेत्याने कान टोचताच कृषी विभागाची पळापळ

महिलांप्रमाणे पुरुषांवरही शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असल्याच्या घटनांमध्ये बाद होत आहे. पत्नी पीडित संघटनेकडे गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक जणांनी याप्रकरणी तक्रारी दिल्या आहेत. तर पोलिस आयुक्तालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलमध्ये ४ महिन्यांत ४८ तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून महिलांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असल्याच्या घटनांमध्ये बाद होत असताना आता चार भिंतीच्या आत पुरुषांवरही अन्याय-अत्याचार होतो. अत्याचार होत असताना पुरुषाला तक्रार करणेही कठीण जाते. महिलांच्या बाजूने कायदा असल्यामुळे महिला या कायद्याचा सदुपयोग करण्याऐ-वजी अनेक महिला याचा दुरुपयोग करत आहेत.

Sambhaji Nagar Crime News : मैत्रिणीसोबत बोलल्याने मित्राचे अपहरण

यामुळे पुरुषांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वास्तव स्वीकारण्याची समाजाची मानसिकता नाही दरम्यान, महिलेकडूनही पुरुषाची छळवणूक होते है वास्तव स्वीकारण्याची समाजाची मानसिकता नाही.

पुरुयच महिलेला छळतो, यावरच समाजाचा दांडगा विश्वास, महिलेने छळले... अशी तक्रारही पोलिसांकडून दाखल करून घेतली जात नाही. महिलेने छळले.. असे सांगणे पुरुषांना लाजिरवाणे वाटते. हाही मानसिकता बदलण्याचा मुद्दा आहे. परिणामी, पीडित पुरुष तक्रार दाखल फरायला धजावत नाहीत. तरीही आता काही बदल होउ लागला आहे.

2025-06-10T08:33:39Z