Khargaon Khurd Bull Incident
म्हसळा : म्हसळा तालुक्यात जनावरांची चोरी होण्याच्या घटना वाढत आहेत. अशाच एका घटनेत एका शेतकऱ्याचा चोरुन नेलेला बैल पोलीस कारवाई होण्याच्या भीतीने चोरांनी सोडून दिल्याची घटना घडली. मृत्यूच्या दाढेतून आलेल्या या बैलाची बळीराजाने पूजा करुन पोलिसांचे आभार मानले आहेत.
म्हसळा तालुक्यातील मौजे खारगाव खुर्द सकलप येथील शेतकरी मंगेश म्हात्रे यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या शेतजमिनीत भात पेरणीच्या वेळी शेत नांगरून झाल्या नंतर बैलजोडी चारा खाण्यासाठी त्यांचे शेतजमिनीत सोडून दिले. सायंकाळी त्यातील एक बैल घरी परत आला नसल्याने त्याचा शोध घेतला असता सापडला नाही. अखेर मंगेश म्हात्रे यांनी माजी सभापती महादेव पाटील यांच्या मदतीने म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लागलीच म्हसळा पोलीस निरीक्षक संदीप कहाळे आणि त्यांच्या पथकाने शहरातील गुप्त माहितीगारांचे मदतीने म्हात्रे यांचा चोरीला गेलेला नांगरणीचा बैल कोणी बांधून ठेवला आहे का याचा शोध घेतला.
सदरची खबर सुगावा लागण्याच्या आत चोरट्यांचे कानावर पडली असावी, आपल्यावर कारवाई होईल या भितीने बैल चोरट्याने बांधून ठेवलेला बैल दुसऱ्या दिवशी सोडून दिल्याने सोडलेला बैल बाय पास मार्गे मालकाचे घरी पोहचला. पोलिसांनी शिताफीने शोध चक्र सुरु केल्याने मृत्यूच्या दाढेत गेलेला नांगरणीचा बैल वाचला.
Raigad News : विद्यार्थी शोधासाठी गुरुजींची भटकंती चंद्रकांत कांबळे, शेतकरीप्रत्येक शेतकऱ्यांनी आपआपल्या गुरांची नोंद केली तर गावात कोणत्या वंशाची किती गोधन आहे याचा मोजमाप होईल आणि त्यांचा जन्म मृत्यू दर कमी जास्त कसा झाला याची माहिती समोर येईल. 2025-06-10T10:49:31Z