Belapur to Pendhar Metro Service: नवी मुंबईतील मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई मेट्रो आता आणखी वेगावान होणार आहे. सध्या नवी मुंबई मेट्रोचा सरासरी ताशी वेग 25 प्रति किलोमीटर इतका आहे. आता लवकरच हा वेग वाढून ताशी 60 प्रति किलोमीटर इतका होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गारेगार आणि सुसाट प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
नवी मुंबई मेट्रोचा वेग वाढल्यावर बेलापूर ते पेंधर हा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. मेट्रोचा वेग वाढल्याने नवी मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.
नवी दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा विभागाने नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर ते पेंधर या पहिल्या मार्गिकेवरील वेगाची चाचणी केली. लवकरच नवी मुंबई मेट्रो ताशी 60 प्रति किलोमीटर या वेगाने धावणार आहे. सरळ मार्गिकेवर ताशी 70 किलोमीटर या वेगानने धावू शकेल तर वळण मार्गावर मेट्रोची गती कमी ठेवण्यात येईल. पुढील दीड महिन्यात वेग चाचणीचे प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा आहे.
हे पण वाचा : Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार; नव्या रचनेच्या लोकल धावणार, 300 फेऱ्या वाढणार
हे पण वाचा : 12 लाखांचे उत्पन्न टॅक्स फ्री नंतर आणखी एक आनंदवार्ता! RBI सर्वसामान्यांना गिफ्ट देणार, लवकरच घोषणा होणार
सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मेट्रो मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गावर 17 नोव्हेंबर 2023 पासून मेट्रो सेवेचे परिचालन सुरू झाले असून या मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सीबीडी बेलापूर परिसर, तळोजा औद्योगिक क्षेत्र आणि सिडकोच्या गृहसंकुलांना या मेट्रो मार्गाद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे.
2025-02-05T11:25:25Z