NARENDRA MODI RUSSIA VISIT : युरोप, अमेरिकेला जमलं नाही, तर मोदींनी पुतीनना तोंडावर बोलून दाखवलं! रशिया दौऱ्यात काय काय घडलं? जगाच्या पाठीवर प्रतिक्रिया उमटल्या

Narendra Modi Russia Visit : तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचा दौरा केला. या दौऱ्यातम मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेन संघर्ष चर्चेद्वारे सोडवण्याची विनंती केली. युद्ध करणे हा दीर्घकालीन समस्यांवर उपाय नाही, असेही मोदी यांनी सांगितल्याचे सूत्रांनी मंगळवारी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी पुतीन यांना सांगितले की, "युद्धभूमीवर कोणताही उपाय नाही. संवाद आणि मुत्सद्दीपणा हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे, प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वासह संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचा आदर करण्याबाबत भारत आपली भूमिका कायम ठेवतो. भारताने घेतलेल्या या भूमिकेनं आणि पुतीन यांना थेट सांगितल्याने पाश्चिमात्य माध्यमांमध्ये प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारताची ही भूमिका बॅलन्स अॅक्ट असल्याचे बोलले जात आहे.

G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या भेटीनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना आवाहन केलं आहे. योगायोगाने, 2022 मध्ये रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची रशियाची पहिली भेट आहे. दोन्ही नेते 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेचे सह-अध्यक्षही असतील, जिथे ते व्यापार, ऊर्जा आणि संरक्षण या क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंधांचा आणखी विस्तार करण्यावर चर्चा होईल. 

मोदी-पुतीन यांच्या गळाभेटीवरून टीका 

दरम्यान, सोमवारी पंतप्रधान मोदी जेव्हा मॉस्कोला पोहोचले तेव्हा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांचे घरी स्वागत केले. दोघांनीही एकमेकांना मिठी मारून स्वागत केले. दुसरीकडे, पाश्चात्य देशांतील विश्लेषकांना पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मिठी मारल्याचे आवडलेलं नाही. त्यामुळे जोरदार टीका केली आहे. मोदी यांच्या रशिया दौऱ्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींच्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भेटीवर प्रश्न उपस्थित केले आणि 'मोठी निराशा' असल्याचे वर्णन केले.

पीएम मोदी आणि पुतीन यांच्या भेटीत काय काय घडलं?

- 2022 मध्ये रशियाने युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यानंतर नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी रशियाला गेले

- मोदींनी पुतीन यांची मॉस्कोबाहेरील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जिथं ते राष्ट्रीय रशियन ड्रेसमध्ये कलाकारांसोबत घोडा शो पाहताना दिसले.

- मोदींनी पुतीन यांचे यजमानपदासाठी आभार मानले आणि दोन्ही राष्ट्रांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी वाढवण्याची इच्छा व्यक्त केली.

- भारत आणि रशियाने इतर गोष्टींसह व्यापार, हवामान आणि संशोधन यासंबंधी नऊ सामंजस्य करार आणि करारांवर स्वाक्षरी केली.

- दोन्ही नेत्यांनी भारत-युरेशियन इकॉनॉमिक युनियन व्यापार आणि वस्तू करारावर चर्चा केली आणि 2030 पर्यंत $100 अब्ज डॉलरचे नवीन व्यापार लक्ष्य निश्चित केले.

- मोदी आणि पुतिन यांनी प्रस्तावित चेन्नई-व्लादिवोस्तोक ईस्टर्न कॉरिडॉरसह कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरबाबतही चर्चा केली

- पुतिन यांनी मोदींच्या युद्धाबाबतच्या भूमिकेची आणि शांततापूर्ण ठराव शोधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

- मोदींनी पुतिन यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयाबद्दल शुभेच्छा पाठवल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

- पुतिन यांनी भारत आणि रशियामध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचाही निषेध केला.

- पुतिन यांनी मोदींना कझान येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले.

पीएम मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात कोणती चर्चा झाली?

- युक्रेनमध्ये नुकत्याच झालेल्या मुलांच्या मृत्यूचा मोदींनी निषेध केला आणि संघर्ष शांततेत सोडवण्याचे आवाहन केले.

- मोदी आणि पुतिन यांनी आपापल्या देशांच्या धोरणात्मक भागीदारीबाबत त्यांच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.

- युक्रेनमध्ये शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी मोदींनी पुतिन यांना आवाहन केले.

- मोदी आणि पुतिन यांनी 2030 पर्यंत त्यांच्या राष्ट्रांमधील व्यापार निम्म्याहून अधिक वाढवून 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे मान्य केले.

- युक्रेनमध्ये रशियासाठी लढण्यासाठी भरती झालेल्या भारतीय नागरिकांची लवकर सुटका करण्यासाठी मोदींनी पुतीन यांच्यावर दबाव वाढवला. 

- मोदींचा रशिया दौरा वॉशिंग्टनमध्ये नाटो शिखर परिषदेच्या अनुषंगाने झाला, ज्यामध्ये युक्रेनवरील आक्रमण हा चर्चेचा प्रमुख विषय होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

2024-07-10T12:21:48Z dg43tfdfdgfd