MONSOON ALERT | राज्यात शुक्रवारपर्यंत मुसळधारेचा अंदाज, घाटमाथ्यावर 24 तासांत जोरदार पाऊस

Torrential rains forecast in the state till Friday, heavy rains in the Ghats within 24 hours

पुणे : राज्यातील बहुतांश भागात रविवारी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. तर राज्यातील सर्वच घाटमाथ्यांवर अतिवृष्टी झाली. सोमवारीही घाटमाथ्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र राज्यात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे.

राज्यात गत् चोवीस तासांत सर्वत्र मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. प्रामुख्याने कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार स्वरुपाचा पाऊस झाला. हा पाऊस राज्यात शुक्रवार (दि.11 जुलै) पर्यंत राहणार आहे. त्यानंतर पाऊस एकदम कमी होत आहे. त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश अन् गुजरात राज्यात पाऊस वाढला तरच राज्यातील पावसाचे अंदाज बदलतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Monsoon Weather News : संततधार जलधारांनी नद्या, नाले तुडुंब

... असा पडेल आठवड्यात पाऊस

- कोकण : अतिवृष्टी : (7 ते 12 जुलै)

- विदर्भ : अतिवृष्टी : (7 व 8 जुलै), मुसळधार : (9 ते 11 जुलै)

- मध्य महाराष्ट्र : मुसळधार (7 व 8 जुलै), हलका पाऊस (9 ते 11 जुलै)

- मराठवाडा : मुसळधार (7 व 8 जुलै), हलका पाऊस (9 ते 11 जुलै)

Monsoon Alert | पुणे घाटमाथ्याला आज, उद्या 'रेड अलर्ट'

.. असे आहेत अलर्ट (कंसात जुलैतील तारखा)

ऑरेंज अलर्ट : (मुसळधार) : रायगड (7, 9), रत्नागिरी (7 ते 9), पुणे घाट (7, 9), नाशिक घाट (9), अमरावती (7, 8), भंडारा (7), चंद्रपूर (7, 8), वर्धा (7), गोंदिया (8), नागपूर (7, 8).

यलो अलर्ट : (मध्यम) : पालघर, ठाणे, मुंंबई (7 ते 9), रायगड (8,10), रत्नागिरी (10), सिंधुदुर्ग (7 ते 9), धुळे (7 ते 9), जळगाव (7, 8), नाशिक (8), पुणे घाट (8, 10), कोल्हापूर घाट (7 ते 9), छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी (7, 8), बीड (8), हिंगोली, नांदेड, अकोला (7, 8), अमरावती (9), भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ (7, 9).

Ratnagiri Heavy Rain | मुसळधार पावसाने राजापूरातील अर्जुना धरण ९० टक्‍के भरले

24 तासांत राज्यात झालेला पाऊस....

कोकण : जव्हार 193, मोखेडा 185, विक्रमगड 183, माथेरान 120, सावंतवाडी 105, सावडे 96, कणकवली 78, दोडामार्ग 75, मुरबाड 75, म्हापसा 61, वाडा 60, चिपळूण 60, सांगे 59, वसई 58, केपे 55, भिवंडी 55, पनवेल 53, पालघर 53, तलासरी 52, अंबरनाथ 49, खेड 46, दापोली 43, कुडाळ 43, ठाणे 43, लांजा 42.

मध्य महाराष्ट्र : ओझरखेडा 143, हर्सूल 129, लोणावळा 109, इगतपुरी 90, महाबळेश्वर 88, शाहूवाडी 85, राधानगरी 83, दिंडोरी 74, त्र्यंबकेश्वर 80, सुरगणा 65, आजरा 60, चांदगड 57, पेठ 57, नवापूर 47, तळोदा 43, वेल्हे 42.

मराठवाडा : किनवट 40, माहूर 26, हिमायतनगर 22, भोकरदन 16, जिंतूर 1.2.

विदर्भ : सालेकसा 37, भामरागड 36, कोरफणा 35, अदहरी 29, जिवती 29, एटापल्ली 26, शेगाव 25.

घाटमाथा : ताम्हिणी 120, शिरगाव 104, लोणावळा 88, अंबोने, कोयना (पोफळी) 83, लोणावळा 76, दावडी 75, कोयना 6.8, डुंगरवाडी 67, खंद 65, वळवण 56, खोपोली 44, भिरा 43, वाणगाव 35, भिवपुरी 32, शिरोटा 2.7, ठाकूरवाडी 23.

2025-07-06T16:35:43Z