MOLESTATION CASES PUNE: अर्धे जग असुरक्षितच! शहरात विनयभंगाच्या पाच घटना

पुणे: शहरात महिला छेडछाडीच्या घटना सुरूच असून, शहरात एका दिवसात विनयभंगाच्या पाच घटना दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या गुन्ह्यात तरुणीला अप्रत्यक्ष शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी 73 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेशचंद (73, रा. पुणे) नावाच्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 27 वर्षीय तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 3 जुलै रोजी सायंकाळी सात ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. (Latest Pune News)

Wagholi Extortion Case: हप्त्याची मागणी करीत व्यावसायिकांना मारहाण; वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल

तरुणी ही एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्याजवळ येऊन तिचा हात पकडला. तसेच तिला चुंबन देण्याची मागणी केली. त्यानंतर तरुणीने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी तुला हॉटेलमध्ये नेतो, माझ्यासोबत जेवायला चल, मला पाहिजे ते तू माझ्यासोबत कर, तुला पाहिजे ते मी देईल, अशी अप्रत्यक्षरीत्या शरीरसुखाची मागणी केली.

दुसर्‍या गुन्ह्यात पैसे परत न केल्याने महिलेला शरीरसुखाची मागणी करत विनयभंग करणार्‍या दाम्पत्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

हा प्रकार दि. 18 डिसेंबर 2024 ते 24 मे 2025 दरम्यान घडला. फिर्यादी महिलेने आरोपी दाम्पत्याकडून पैसे उसने घेतले होते. त्यातील काही रक्कम फिर्यादी यांनी परत दिली होती. उर्वरित रक्कम परत करण्यासाठी काही दिवसांची मुदतवाढीची मागणी केली. या वेळी आरोपीने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून तुझे दिलेले सर्व पैसे सोडून देतो म्हणत शरीरसुखाची मागणी केली.

तिसर्‍या गुन्ह्यात तू आमचे व्हिडीओ शूटिंग का करत आहे, अशी विचारणा केली असता 58 वर्षीय महिलेला व तिच्या बहिणीचा विनयभंग केल्याप्रकरणात एका 58 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 3 जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Child Trafficking: मन सुन्न करणारी घटना! जन्मदात्यांनी साडेतीन लाखांत पोटच्या मुलीला विकले

चौथ्या गुन्ह्यात 9 वर्षांच्या शाळकरी मुलीशी अश्लील चाळे करणार्‍या 50 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजू पिसे नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर पाचव्या घटनेत 22 वर्षांच्या तरुणीला आपण रिलेशनशिपमध्ये राहू, असे म्हणून तिचा विनयभंग करत तिला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने तरुणीसोबत काढलेले फोटो घरच्यांना व समाजमाध्यमांवर पाठविण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी विजेंद्र क्षीरसागर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2025-07-06T06:35:46Z